शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

नागपूर माघारले<bha>;</bha> स्मार्ट सिटी रँकिंगमध्ये ४४ वा क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कामे सुरू असलेल्या देशभरातील शहरांचे रँकिंग केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयातर्फे केले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कामे सुरू असलेल्या देशभरातील शहरांचे रँकिंग केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयातर्फे केले जाते. गेल्या वर्षी मार्च महिन्यात देशातील १०० शहरात पहिल्या क्रमांकावर नागपूर होते. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर होते. मे महिन्यात २८ व्या क्रमांकावर होते. तर जानेवारी २०२१ मध्ये जारी करण्यात आलेल्या स्मार्ट शहराच्या यादीत नागपूर ४४ व्या क्रमांकावर गेले आहे.

रॅकिंगसाठी विविध प्रकारचे निकष गृहीत धरण्यात येतात. यात स्मार्ट सिटी प्रकल्पावरील खर्च, प्रकल्पाची प्रगती, कार्यादेश, निविदा प्रक्रिया, प्राप्त निधीचा खर्च, महापालिकेचा परफाॅर्मन्स अशा बाबींचा यात समावेश असतो. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्मार्ट सिटी सीईओ पदाची सूत्रे स्वीकारली तेव्हा नागपूर २८ व्या क्रमांकावर होते. त्यानंतर सुधारणा होत २३ व्या क्रमांकावर आले होते. राज्यात प्रथम क्रमांकावर असलेल्या पुणे शहराचा देशात १८ क्रमांक आहे. नाशिक २०, ठाणे २३, पिंपरी चिचवड ४१ असून नागपूरच्या तुलनेत या शहरांनी चांगली कामगिरी केली आहे. प्रकल्प रखडल्याचा नागपूर शहराला फटका बसला आहे.

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गंत शहरात विविध प्रकारचे प्रकल्प राबविले जात आहे. यात प्रोजेक्ट टेंडर शुअर प्रकल्प पूर्व नागपुरातील भरतवाडा, पारडी, पुनापूर या भागातील १७३० एकर परिसरात उभारला जात आहे. ६५० कोटींचा हा प्रकल्प आहे. होम स्वीट होम हा २२० कोटींचा प्रकल्प आहे.

मार्च २०१८ मध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात झाली. ३५८८.९७ कोटींचा हा प्रकल्प आहे. यात नागपूर सेफ अ‍ॅन्ड स्मार्ट सिटी प्रोजेक्ट, प्रोजेक्ट टेंडर शुअर व प्रोजेक्ट होम-स्वीट-होम या प्रमुख प्रकल्पांचा समावेश आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभाग, नागपूर पोलीस आयुक्तालय व स्मार्ट अ‍ॅन्ड सस्टेनबल सिटी डेव्हलमेंट कॉर्पाेरेशन लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने सेफ अ‍ॅन्ड स्मार्ट सिटी प्रोजेक्ट राबविला जात आहे.

....

स्मार्ट सिटी परफॉर्मन्स

मार्च २०२०- प्रथम क्रमांक

मे २०२०-२८ वा क्रमांक

जानेवारी २०२१-४४ वा क्रमांक