शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

By निशांत वानखेडे | Updated: September 16, 2025 20:49 IST

दिवसभर शांतता, सायंकाळी धुमाकूळ, तासभर धुवांधार : अनेक भागात साचले पाणी : चाकरमाण्यांची दाणादाण

Nagpur Rains : साेमवारप्रमाणे मंगळवारीही नागपूरकरांनी मुसळधार पावसाचे भयावह रूप पुन्हा अनुभवले. दिवसभर  शांत राहिलेल्या काळ्या ढगांमधून सायंकाळी मुसळधार सरी बरसल्या. साेबत मेघगर्जनेसह विजांच्या प्रचंड कडकडाटाने नागरिकांना चांगलीच धडकी भरली. पावसाची तीव्रता आजही जबरदस्त होती. जवळपास तासभर धो-धो पावसाचे थैमान सुरू राहिले. रस्त्यावर तलावासारखे पाणी साचल्याने वाहतुकीचा फज्जा उडाला व  जनजीवन विस्कळीत झाले. 

हवामान विभागाने १५ व १६ सप्टेंबरला नागपुरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला हाेता. त्यानुसार  साेमवारी दुपारी भीतीदायक पाऊस बरसला. पावसाचा जाेर रात्रीही कायम हाेता. मंगळवार सकाळपर्यंत २४ तासात शहरात ५५.६ मि.मी. पावसाची नाेंद करण्यात आली. सकाळपासूनही ढगाळ वातावरण कायम हाेते. मध्यमध्ये ढगांचे रुपही काळेकुट्ट झाले हाेते पण पावसाने शांतता बाळगली हाेती. मात्र सायंकाळी ५ पासून  वातावरण बदलले.

५.३० वाजता रिमझिम सरींसह पाऊस सुरू झाला. मात्र ६ वाजता पावसाची तीव्रता प्रचंड वाढली. जाेरदार गर्जन व विजांच्या कडकडाटासह धाे-धाे पाऊस बरसला. ही काेसळधार जवळपास तासभर सुरू हाेती. त्यानंतर जाेर कमी झाला पण मध्यम पावसाची रिमझिम सुरू राहिली. विशेष म्हणजे ऐन सुटीच्या वेळी जाेरदार पाऊस  बरसल्याने कार्यालयीन कर्मचाऱ्यांची चांगलीच दाणादाण उडाली. वादळासह पाऊस असल्याने रेनकाेटही तग धरू शकत नव्हते. त्यामुळे चाकरमाण्यांना घराकडे निघणे शक्य झाले नाही. जे निघाले ते रस्त्यात अडकले  व बरेच भिजले. 

अनेक रस्ते, वस्त्या जलमय

क्षणात आलेले जाेर‘धार’ पावसामुळे शहरातील बहुतेक रस्ते जलमय झाले हाेते. सीताबर्डी, नरेंद्रनगर, नरेंद्रनगरचा पूल, त्रिमूर्तीनगर, गाेपालनगर, गाेपालनगर बसस्टँड, धंताेली, काेराडी राेड परिसरातील रस्त्यावर नेहमीप्रमाणे तलाव झाले हाेते. त्यामुळे वाहतुकीचा प्रचंड खाेळंबा निर्माण झाला. शहरातील व लगतच्या सखल भागातील वस्त्यांमध्येही पाणी शिरले हाेते. 

पाऊस राहिल पण जाेर कमी 

हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या २२ सप्टेंबरपर्यंत नागपूरसहविदर्भातील बहुतेक जिल्ह्यात पावसाळी  वातावरण कायम राहणार आहे. मात्र त्याचा जाेर कमी असेल.

दाेन तासात ५०.६ मि.मी. नाेंद

दिवसभर ढग शांत असल्याने सायंकाळपर्यंत पावसाची नाेंद झाली नाही. मात्र सायंकाळी ६ वाजतापासून पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला हाेता. तासभर धाे-धाे जलधारा बरसल्या. त्यानंतर मध्यम पावसाची रिमझिम चालली हाेती. रात्री ८.३० वाजतापर्यंत शहरात ५०.६ मि.मी. पाऊस नाेंदविला गेला.

टॅग्स :nagpurनागपूरVidarbhaविदर्भRainपाऊसmonsoonमोसमी पाऊस