लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने बुधवारी दक्षिण एक्स्प्रेसमध्ये २४.५ किलोग्रॅम वजनाचा २.४५ लाखाचा गांजा असलेल्या दोन ट्रॉलीबॅग पकडल्या. जप्त केलेला गांजा कागदोपत्री कारवाईनंतर लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला.रेल्वे सुरक्षा दलाचा जवान विकास शर्मा हा बुधवारी सकाळी ९.२० वाजता प्लॅटफार्म क्रमांक १ वर उभ्या असलेल्या रेल्वेगाडी क्रमांक १२७२१ दक्षिण एक्स्प्रेसमध्ये गस्त घालत होता. यावेळी समोरील जनरल कोचमध्ये काळ्या आणि निळ्या रंगाच्या दोन ट्रॉलीबॅग बेवारस स्थितीत आढळल्या. बॅगबाबत विचारणा केली असता त्यावर कुणीच आपला हक्क सांगितला नाही. दोन्ही ट्रॉली बॅग गाडी खाली उतरवून त्याची सूचना उपनिरीक्षक गौरीशंकर एडले यांना देण्यात आली. त्यानंतर श्वान पथकास पाचारण करण्यात आले. श्वान रेक्सने दोन्ही बॅगची तपासणी करून त्यात मादक पदार्थ असल्याचा संकेत दिला. बॅग उघडून पाहिल्या असता त्यात १२ पाकिटात २४.५ किलो वजनाचा २.४५ लाखाचा गांजा असल्याचे आढळले. गांजाचा वास येऊ नये यासाठी त्यात नॅपथेलिन नावाच्या गोळ्या ठेवण्यात आल्या होत्या. कागदोपत्री कारवाई केल्यानंतर पकडलेला गांजा लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला. ही कारवाई रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
नागपूर रेल्वेस्थानकावर २.४५ लाखाचा गांजा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 21:53 IST
रेल्वे सुरक्षा दलाने बुधवारी दक्षिण एक्स्प्रेसमध्ये २४.५ किलोग्रॅम वजनाचा २.४५ लाखाचा गांजा असलेल्या दोन ट्रॉलीबॅग पकडल्या. जप्त केलेला गांजा कागदोपत्री कारवाईनंतर लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला.
नागपूर रेल्वेस्थानकावर २.४५ लाखाचा गांजा पकडला
ठळक मुद्देदक्षिण एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा दलाची कारवाई