नागपुरात मालमत्ता टॅक्सची थकबाकी १६५ कोटींनी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 07:14 PM2020-05-23T19:14:15+5:302020-05-23T19:29:59+5:30

नागपूर शहरात ७ लाख ३१ हजार ४२१ मालमत्ता आहेत. या मालमत्ताधारकांकडून २०२०-२१ या वर्षात थकबाकीसह येणे वसुली ६७९.०४ कोटींची आहे. २०१९-२० या वर्षात ६ लाख ८४ हजार ७५० मालमत्ताधारकांकडून थकबाकीसह ५१४.७५ कोटींचा टॅक्स वसूल करावयाचा होता. परंतु गेल्या आर्थिक वर्षात टॅक्सच्या माध्यमातून २४५ कोटींची वसुली झाली. थकबाकी वसूल होत नसल्याने व गेल्या वर्षाच्या तुलनेत टॅक्सच्या थकीत रकमेत १६५ कोटींची वाढ झाली आहे.

In Nagpur, property tax arrears increased by Rs 165 crore | नागपुरात मालमत्ता टॅक्सची थकबाकी १६५ कोटींनी वाढली

नागपुरात मालमत्ता टॅक्सची थकबाकी १६५ कोटींनी वाढली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरात ७ लाख ३१ हजार ४२१ मालमत्ता आहेत. या मालमत्ताधारकांकडून २०२०-२१ या वर्षात थकबाकीसह येणे वसुली ६७९.०४ कोटींची आहे. २०१९-२० या वर्षात ६ लाख ८४ हजार ७५० मालमत्ताधारकांकडून थकबाकीसह ५१४.७५ कोटींचा टॅक्स वसूल करावयाचा होता. परंतु गेल्या आर्थिक वर्षात टॅक्सच्या माध्यमातून २४५ कोटींची वसुली झाली. थकबाकी वसूल होत नसल्याने व गेल्या वर्षाच्या तुलनेत टॅक्सच्या थकीत रकमेत १६५ कोटींची वाढ झाली आहे.
गेल्या वर्षात २ लाख ७५ हजार ४८० मालमत्ताधारकांनी टॅक्स भरला. तर ४ लाख ९ हजार मालमत्ताधारकांनी टॅक्स भरलेला नाही. त्यामुळे या थकबाकीदारांसह वित्त वर्षातील टॅक्स गृहीत धरता ६७९.०४ कोटींची वसुली मालमत्ता विभागाला करावयाची आहे. टॅक्स थकबाकीदारांची वाढती संख्या हा मालमत्ता विभागासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. २०१९-२० या वर्षात ५१४.७५ कोटी तर २०१८-१९ या वर्षात ३२३.३६ कोटीची वसुली करावयाची होती. मागील दोन वर्षात टॅक्स वसुली व उद्दिष्ट यात मोठी तफावत असल्याने थकबाकीचा आकडा दरवर्षी वाढत आहे. विशेष म्हणजे मोठे थकबाकीदार व शासकीय कार्यालये यांच्याकडे जवळपास २५० कोटींची थकबाकी आहे.
लक्ष्मीनगर झोनमध्ये सर्वाधिक टॅक्स येणे आहे. झोनमधील ४३,४१५ मालमत्ताधारकांकडून १२५.७२ कोटी येणे आहे. त्याखालोखाल नेहरूनगर झोनमधील ६०,६५९ मालमत्ताधारकांकडून १२०.०३ कोटी येणे आहे.

आक्षेप व तक्रारींचा वसुलीला फटका
शहरातील मालमत्तांचा सर्व्हे करताना मालमत्ताधारकांना विचारणा करण्यात आलेली नाही. नकळत हा सर्व्हे करण्यात आला. यावर आक्षेप वा तक्रारी करण्याची संधी न देता मालमत्ताधारकांना डिमांड पाठविण्यात आल्या. वाढीव डिमांडवर मालमत्ताधारकांनी मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदविले. याचा परिणाम टॅक्स वसुलीवर झाला.

झोन स्तरावर अंमलबजावणी नाही
महापालिकेची आर्थिक स्थिती विचारात घेता टॅक्स वसुलीच्या माध्यमातून वसुली झाल्यास काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. परंतु सध्याची लॉकडाऊनची परिस्थिती लक्षात घेता पुढील काही महिने लोकांच्या हाती पैसा येण्याची शक्यता नाही. त्यातच मुख्यालयाने दिलेल्या निर्देशांची झोन स्तरावर अंमलबजावणी होत नसल्याने उद्दिष्ट गाठणे अवघड आहे.

झोननिहाय मालमत्ता व येणे रक्कम (कोटीत)
लक्ष्मीनगर -४३,४१५    १२५.७२
धरमपेठ २१,६४४          ४०.१२
हनुमाननगर-५०९०७    ७२.४९
धंतोली ८९८६  २           ९.१४
नेहरुनगर ६०६५९         १२०.०३
गांधीबाग १५९४०         १४.००
सतरंजीपुरा २७४४३     २६.३४
लकडगंज ५६६०१         ७३.०७
आसीनगर ९७१५३      १०२.४०
मंगळवारी ५३९३३      ७५.६५

Web Title: In Nagpur, property tax arrears increased by Rs 165 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.