शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

नागपुरात ११ हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 21:57 IST

वारंवार पाठपुरावा करूनही वीजबिलांचा भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रातील तब्बल ११ हजार २४० ग्राहकांचा वीजपुरवठा फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत खंडित करण्यात आला असून, ग्राहकांनी वीजबिलांचा नियमितपणे भरणा करून वीजपुरवठा खंडित होण्याची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

ठळक मुद्देवीजबिल नियमित भरा : महावितरणचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर : वारंवार पाठपुरावा करूनही वीजबिलांचा भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रातील तब्बल ११ हजार २४० ग्राहकांचा वीजपुरवठा फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत खंडित करण्यात आला असून, ग्राहकांनी वीजबिलांचा नियमितपणे भरणा करून वीजपुरवठा खंडित होण्याची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रात १ फेब्रुवारी २०१९ रोजी देय मुदतीत वीज बिलांचा भरणा न केल्याने थकबाकीत असलेल्या घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक वर्गवारीतील तब्बल १ लाख ७६ हजार ९७९ वीज ग्राहकांकडे सुमारे ७० कोटी ३१ लाख रुपयांची थकबाकी होती; यापैकी बहुतांश ग्राहकांनी दोन महिन्यांपासून त्यांच्या वीजबिलांचा भरणा केलेला नाही.महावितरणने सप्टेंबर महिन्यापासून संपूर्ण राज्यभर सुरू केलेल्या केंद्रीकृत बिलिंग प्रणालीमुळे बिलिंगची संपूर्ण प्रक्रिया महावितरणच्या सांघिक कार्यालयामार्फ़त राबविण्यात येत असल्याने, थकबाकीदार ग्राहकांवरही सांघिक कार्यालयाकडून विशेष लक्ष देण्यात येत आहे. थकबाकीचा वाढता बोजा लक्षात घेता महावितरणला आपला आर्थिक गाडा खेचणे तारेवरची कसरत ठरत आह. वीज खरेदी, कर्मचाऱ्यांचे वेतन, विविध विकास कामांसाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज देण्यात महावितरणची बहुतांश रक्कम खर्च होत होती. यामुळे देखभाल व दुरुस्ती यासाठी महावितरणकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने १०० टक्के थकबाकी वसुलीसाठी महावितरण आग्रही आहे. ही वसुली करण्यासाठी नागपूर परिक्षेत्रांतर्गत असलेल्या संपूर्ण विदर्भात थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची व्यापक मोहीम हाती घेण्यात आली असून, या मोहिमेत आतापर्यंत ११ हजार २४० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. शून्य थकबाकीचे लक्ष्य निर्धारित करीत ही मोहीम दिवसेंदिवस अधिक आक्रमक करण्याच्या स्पष्ट सूचना प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.महावितरणच्या या विशेष मोहिमेत चालू महिन्यात आतापर्यंत एकूण १ लाख ७६ हजार ९७९ थकबाकीदार वीज ग्राहकांपैकी ७३ हजार ९९५ ग्राहकांकडून १६ कोटी २८ लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे, तर ७,००४ थकबाकीदारांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात आणि ४,२३६ थकबाकीदारांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला असून, त्यापैकी २,०६५ ग्राहकांनी रीतसर पुनर्जोडणी शुल्क आणि थकबाकीचा भरणा केल्याने त्यांचा वीजपुरवठा पूर्ववत जोडण्यात आला आहे. उर्वरित थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे काम सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तत्पूर्वी जानेवारी महिन्यातही नागपूर परिक्षेत्रातील तब्बल १६ हजार ७६२ थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. पाच हजारावरील आणि एक हजारावरील थकबाकी असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यास प्राधान्य देत महावितरणने या मोहिमेची अंमलबजावणी अधिक आक्रमकपणे सुरू केली असून, ग्राहकांनी देय मुदतीच्या आत नियमितपणे वीजबिलांचा भरणा करीत सहकार्य करावे आणि वीजपुरवठा खंडित होण्याची कटू कारवाई टाळण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणPower Shutdownभारनियमन