शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

अपघात रोखण्यासाठी पोलिसांचे ‘मिशन जीवनरक्षा’, नागपुरात रिफ्लेक्टर्स असलेले बॅरिकेड्स

By योगेश पांडे | Updated: March 11, 2025 00:01 IST

नागरिक निष्काळजीपणे भरधाव वेगाने वाहने चालवितात व त्यातच अनेकांचा बळी जातो असे दिसून आले आहे. यातूनच ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. 

-योगेश पांडे, नागपूरउपराजधानीतील वाहतूकीची समस्या दिवसेंदिवस वाढत असून अपघातांचे प्रमाणदेखील चिंताजनक आहे. हीच बाब लक्षात घेऊन नागपूर पोलिसांनी अपघात रोखण्यासाठी ‘मिशन जीवनरक्षा’ ही मोहीम हाती घेतली आहे. पोलिसांनी शहरातील १८ ब्लॅकस्पॉट्सचा शोध घेतला असून तेथील अपघात कमी करण्यावर भर देण्यात येणार आहे. या सर्व ब्लॅकस्पॉट्सवर रिफ्लेक्टर्स असलेले बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

‘मिशन जीवनरक्षा’ या उपक्रमाचा उद्देश रस्त्यावरील प्राणांकित अपघात कमी करणे आणि लोकांच्या जीवाची रक्षा करणे हा आहे. रस्ते आणि अपघात यामध्ये होणाऱ्या मृत्यूमध्ये दरवर्षी १० टक्के घट करण्याबाबत पोलीस महासंचालक कार्यालयाने परिपत्रक निर्गमित केलेले आहे. 

पोलिसांकडून वाहतुकीविषयी जनजागृती, नो हॉर्निंग मोहिम, शहरातील डार्क झोन दूर करणे, सीसीटीव्ही कार्यप्रणाली अधिक सक्षम करणे, कमांड कंट्रोल सेंटर प्रभावीपणे कार्यान्वित करणे या विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. मात्र नागरिक निष्काळजीपणे भरधाव वेगाने वाहने चालवितात व त्यातच अनेकांचा बळी जातो असे दिसून आले आहे. यातूनच ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. 

शहरातील १८ ब्लॅकस्पॉट्सच्या ठिकाणी प्रत्येककी ५ बॅरिकेड्स लावून त्यावर स्टिकर आणि रिफ्लेक्टर बसवण्याचे आदेश वाहतूक शाखेच्या सहायक पोलीस आयुक्त माधुरी बाविस्कर यांनी दिले आहेत.

वाहतूक पोलीस निरीक्षकांची बैठक

पोलीस आयुक्त डॉ.रविंद्रकुमार सिंगल यांच्या निर्देशांनुसार माधुरी बाविस्कर यांनी शहरातील १० वाहतूक झोनमधील वाहतूक पोलीस निरीक्षकांची बैठक आयोजित केली. या बैठकीमध्ये मागील वर्षी झालेल्या प्राणघातक अपघातांची संख्या, चालू वर्षी आतापर्यंत झालेल्या अपघातांची संख्या आणि एकूण अपघातांची आकडेवारी याचा आढावा घेण्यात आला.

हे आहेत अपघाताचे प्रमुख हॉटस्पॉट्स

- खोब्रागडे चौक ते साई मंदिर कटिंग

- मंगळवारी बाजार कटिंग ते तथागत चौक,

- कपिल नगर चौक ते कामगार नगर चौक,

- मारुती शोरूम चौक ऑटोमोटिव चौक,

- प्रधानमंत्री गृहनिर्माण ते पिवळी नदी चौक

- विटाभट्टी चौक ते विनोबा भावे नगर गेट कटिंग

- चिखली चौक

- सर्जा बार भारत नगर कटिंग

- जुना पारडी नाका ते हेमंत सेलिब्रेशन

- कापसी उड्डाणपूल परिसर

- संघर्ष नगर चौक

- छत्रपती चौक

- खामला चौक

- मानकापूर चौक नवीन काटोल नाका चौक

- वाडी टी पॉइंट ते शुभम मंगल कार्यालय

टॅग्स :AccidentअपघातNagpur Policeनागपूर पोलीसtraffic policeवाहतूक पोलीस