शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात आता पोलीस घेणार नागरिकांना त्रास न देण्याची शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 22:42 IST

‘‘मी आज शपथ घेतो की, आजपासून पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन येणाऱ्या, अडचणी मांडणाऱ्यांना कसलाही त्रास देणार नाही. पैसे मागणार नाही किंवा पैशासाठी तसेच अन्य कोणत्याही कारणासाठी कुणालाच त्रास देणार नाही’’ अशी शपथ प्रत्येक ठाण्यात पोलीस अधिकारी व कर्मचारी दररोज घेणार आहेत’’

ठळक मुद्देपोलीस आयुक्त उपाध्याय यांचा पुढाकार : प्रत्येक ठाण्यात कामकाजाच्या सुरुवातीला होणार शपथविधी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘‘मी आज शपथ घेतो की, आजपासून पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन येणाऱ्या, अडचणी मांडणाऱ्यांना कसलाही त्रास देणार नाही. पैसे मागणार नाही किंवा पैशासाठी तसेच अन्य कोणत्याही कारणासाठी कुणालाच त्रास देणार नाही’’ अशी शपथ प्रत्येक ठाण्यात पोलीस अधिकारी व कर्मचारी दररोज घेणार आहेत’’, होय यावर विश्वास बसणार नाही. परंतु हे खरे आहे. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या पुढाकाराने हे शक्य झाले असून गुरुवारपासून प्रत्येक पोलीस ठाण्यात कामकाजाला सुरुवात करण्यापूर्वी अशी शपथ घ्यावी लागणार आहे.पोलीस ठाण्यात एखादी तक्रार घेऊन जाणाऱ्या सामान्य नागरिकांना कशी वागणूक मिळते, अशी विचारणा केली तर ९९ टक्के लोकांची उत्तरे ‘चांगली वागणूक मिळत नाही, असेच असेल. यातच मागील काही दिवसात पोलीस अधिकारी लाच घेताना ज्या पद्धतीने सापडत आहेत, त्यामुळे पोलिसांची प्रतिमा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी या सर्व घटनांना अतिशय गांभीर्याने घेत पोलिसांची प्रतिमा सुधारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यापुढे प्रत्येक पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन येणाऱ्या, अडचणी मांडणाऱ्यांना कसलाही त्रास देणार नाही, अशी शपथ स्वत: पोलिसांना घ्यावी लागणार आहे. गुरुवारपासून प्रत्येक पोलीस ठाण्यात याची सुरुवात होणार असून कामकाज सुरू होण्यापूर्वी प्रत्येक पोलीस अधिकारी व कर्मचारी अशी शपथ घेतील.एसीबीने तीन दिवसात दोन पोलीस ठाण्यात धडक कारवाई केली. त्यामुळे पोलिसांच्या लाचखोरीची चर्चा नव्याने सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी मंगळवारी पाचपावली आणि जरीपटका ठाण्यातील ठाणेदारांची बदली केली. तसेच आणखी काही ठाणेदारांचा पर्याय शोधला जात आहे. इतकेच नव्हे तर ‘पैशासाठी सर्वसामान्य लोकांना त्रास दिला तर खबरदार‘ अशा शब्दातही पोलीस आयुक्तांनी पोलिसांना फटकारले.या सर्व पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी शपथविधीचा निर्णय घेतला असून गुरुवारी सकाळपासून त्याची अंमलबजावणी प्रत्येक ठाण्यात कामकाज सुरू होण्यापूर्वी केली जाणार आहे. पोलीस आयुक्तांचा हा निर्णय अतिशय स्तुत्य व अभिनंदनीय आहे, परंतु त्यावर अधिकारी व कर्मचारी किती गांभीर्याने अंमलबजावणी करतात हे तर येणारी वेळच ठरवेल.पोलीस ठाण्याच्या कामाचेही गोपनीय ऑडिट होणारदरम्यान प्रत्येक पोलीस ठाण्यातील कामकाजाचेसुद्धा गोपनीय ऑडिट करण्यात येणार आहे. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त नीलेश भरणे हे पोलीस ठाण्यातील कामकाजाचे गोपनीय ऑडिट करणार आहेत.

टॅग्स :Policeपोलिसcommissionerआयुक्तnagpurनागपूर