शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीसांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याची धमकी, फोन करणारा पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 12:44 IST

फेक कॉल असल्याचं तपासात उघड

नागपूरउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरस्थित घरापुढे बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन पोलिसांना आला. मध्यरात्री आलेल्या या कॉलने पोलिस यंत्रणेत एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तत्काळ फडणवीस यांच्या घराच्या आसपासच्या परिसराची कसून पाहणी केली असता असे काही आढळून आले नाही. या प्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे.

माहितीनुसार, नागपूर पोलिसांच्या कंट्रोल रुमला मध्यरात्री २च्या सुमारास एक कॉल आला व त्यात एका व्यक्तीने देवेंद्र फडणवीस यांच्या घरापुढे बॉम्ब ठेवल्याचे सांगत धमकी दिली. त्यानंतर हा फोन कट झाला. यानंतर फडणवीस यांच्या घरी बॉम्ब शोधक पथक पाठवण्यात आले व पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला. पोलिसांनी फडणवीस यांच्या घराजवळील परिसराची पूर्णपणे तपासणी केली. यावेळी संशयास्पद अशी कुठलीही वस्तू आढळून आली नाही.

दरम्यान, पोलिसांनी ज्या परिसरातून हा फोन आला त्याची चौकशी केली. सदर व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. फोन करणारा व्यक्ती हा कन्हान भागातील राहणारा असून घरची वीज गेली म्हणून रागात बॉम्ब ठेवल्याचा फोन त्याने केला, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी