शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर पोलिसांनी सोशल मीडिया आणि सायबर गुन्हांवर नजर ठेवण्यासाठी सुरु केली 'गरुड दृष्टी'

By योगेश पांडे | Updated: May 28, 2025 17:03 IST

Nagpur : नागपुरातील तरुणांच्या व्हिजनमुळे पोलिसांना 'गरुडदृष्टी'

योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील काही कालावधीपासून संपूर्ण देशात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. विशेषतः सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक तेढ निर्माण करून कायदा व सुव्यवस्थेवर आघात करणारे 'डिजिटल असुर' चिंतेचा विषय बनले आहे. अशाच तत्त्वावर बारीक लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांच्या पोस्ट व्हायरल होण्याअगोदरच त्या हटविण्यासाठी नागपूरपोलिसांच्या हाती गरुडदृष्टी'चे अस्त्र आले आहे. नागपुरातील तरुणांच्या व्हिजनमुळे ही प्रणाली विकसित झाली असून याच्यामुळे सोशल माध्यमांतील घडामोडींवर विशेष लक्ष ठेवता येणार आहे. विशेष म्हणजे, नागपूर पोलिसांनी आयोजित केलेल्या 'सायबर हॅकेथॉन'मधूनच नागपूरकर तरुणांची ही 'आयडिया' प्रत्यक्षात उतरली आहे.

श्रेयस कावळे, अखिलेश तळसमुद्रकर, साईश चवरे या तीन तरुणांच्या प्रयत्नाने सायबर पोलिसांना मोठे बळ मिळाले आहे. तीनही तरुण आयटी विषयातील तज्ज्ञ आहेत. ३० वर्षीय श्रेयस हा स्वतः आयटी कंपनी चालवतो व तो सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे, तर अखिलेश व साईश हे दोघेही सायबर सुरक्षेच्या 'डोमेन'मध्ये काम करतात. पोलिसांनी काही महिन्यांअगोदर 'सायबर हॅकेथॉन'चे आयोजन केले होते. सायबर समस्यांवर आयटीच्या माध्यमातून

भविष्यात गुन्ह्यांना रोखण्याचे व्हिजनश्रेयससोबत 'लोकमत'ने संवाद साधला असता त्याने सायबर गुन्हेगारी वाढत असल्याने ते आयटी इंडस्ट्री व पोलिस यंत्रणेसमोरील मोठे आव्हान असल्याचे स्पष्ट केले. सहाःस्थितीत 'गरुडदृष्टी'तून गुन्हेगारांकडून होणाऱ्या सोशल मीडियावरील हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. पोलिस विभागाच्च्या आवश्यकता लक्षात घेऊन यात आणखी अपडेट्स करण्यात येणार आहेत. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्याकडून याबाबत सातत्याने मार्गदर्शन मिळत असल्याचे श्रेयसने स्पष्ट केले. 

पॅकेजपेक्षा इनोव्हेशनवर दिला भर

  • श्रेयस हा सामान्य कुटुंबातील तरुण असून नागपुरातीलच एका महाविद्यालयातून त्याने अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली होती. काही वर्षे त्याने घराला आधार देण्यासाठी नोकरीदेखील केली. मात्र, लहानपणापासून 'इनोव्हेशन'मध्येच त्याला जास्त रस होता.
  • त्यामुळे पॅकेजचा मोह न धरता त्याने २०२० साली स्वतःची कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या माध्यमातून विविध संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यावर त्याने व त्याच्या सहकाऱ्यांनी भर दिला. कमी वयातच त्यातून त्याने 'टेक एन्ट्ररप्रेनर' अशी ओळख प्रस्थापित केली.

 

टॅग्स :nagpurनागपूरSocial Mediaसोशल मीडियाPoliceपोलिसcyber crimeसायबर क्राइम