शहरं
Join us  
Trending Stories
1
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
2
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
3
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
4
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
5
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
6
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
7
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
8
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
9
"सत्यनारायण पूजेसाठी दिवसभर उपवास अन् नंतर...", शेफालीचा पती पराग त्यागीने दिली माहिती
10
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
11
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
12
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
13
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
14
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
15
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
16
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
17
Paresh Rawal : "आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
18
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
19
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
20
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका

चोरीच्या पैशातून कार विकत घेतली, त्यातूनच मालाची हेराफेरी केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2022 16:35 IST

चोरी केल्यानंतर मिळालेल्या ऐवजातून ही कार आपण खरेदी केल्याचे पंकजने पोलिसांना सांगितले आहे. याच कारमधून चोरीचे साहित्य इकडून तिकडे करीत होतो, असेही त्याने कबूल केले.

ठळक मुद्देसोनेगाव पोलिसांनी चोरट्याचा लावला छडा

नागपूर : अल्पवयीन मुलाचे अपहरण करून अत्याचार करण्याच्या प्रकरणात आरोपी असलेला कुख्यात गुन्हेगार घरफोडीच्या गुन्ह्यातही सहभागी असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी पंकज कन्हैयालाल उरकुडे (वय २०, रा. बेलतरोडी) नामक या गुन्हेगाराला अटक केली असून, त्याचा साथीदार प्रणव ठाकरे (रा. खामला) मात्र फरार आहे.

सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी नीलेश शर्मा हे बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी त्यांचे घर फोडले. त्यांच्या घरातील १ लाख १८ हजारांची रोकड तसेच लॅपटॉप मोबाइलसह १ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता. सोनेगाव पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करून चाैकशी केली असता, आरोपी पंकज उरकुडे आणि प्रणव ठाकरे यात सहभागी असल्याचे कळाले. त्यावरून पोलिसांनी अमरावती जिल्ह्यातील मोर्शीत जाऊन आरोपी पंकजच्या मुसक्या बांधल्या.

त्याच्याकडून एका कारसह दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. विशेष म्हणजे, आरोपी पंकजने एका अल्पवयीन मुलालाही पळवून नेल्याचे यावेळी उघड झाले. त्याने गुन्ह्यांची कबुली देतानाच सोनेगाव तसेच बजाजनगरातील घरफोडीचे गुन्हे कुख्यात चोरटा प्रणव ठाकरेच्या मदतीने केल्याचे पोलिसांना सांगितले. त्यावरून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.

विशेष म्हणजे, चोऱ्या, घरफोडी करून अय्याशी करण्याच्या वृत्तीचे हे दोन्ही गुन्हेगार आहेत. पंकजकडून पोलिसांनी एक कारही जप्त केली. चोरी केल्यानंतर मिळालेल्या ऐवजातून १ लाख ७४ हजार ७०० रुपये किमतीची ही कार आपण खरेदी केल्याचे पंकजने पोलिसांना सांगितले आहे. याच कारमधून चोरीचे साहित्य इकडून तिकडे करीत होतो, असेही त्याने कबूल केले आहे.

इकडे चोरी तिकडे ऐशआराम

आरोपी पंकज आणि प्रणव ठाकरे हे नागपुरात चोऱ्या करून मोर्शीत ऐशआरामाचे जीवन जगत होते. त्यांनी तेथे एक घर भाड्याने घेतल्याचेही प्राथमिक चाैकशीतून उघड झाले आहे. पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनाखाली सोनेगावचे ठाणेदार दिलीप सागर यांच्या नेतृत्वात तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीKidnappingअपहरण