शहरं
Join us  
Trending Stories
1
शिरूरमध्ये 'तुतारी'ने वाढवलं अमोल कोल्हेंचं टेन्शन; निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवणार?
2
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
3
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
4
संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची संपत्ती किती? रिव्हॉल्व्हर, बंदूक, 12 किलो चांदी...
5
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
6
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
7
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
8
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
9
भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब
10
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
11
'ती' कविता ऐकून थेट उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, म्हणाले...
12
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
13
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
14
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
15
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
16
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
17
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
18
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
19
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
20
May Born Astro: मे महिन्यात जन्मलेले लोक म्हणजे चेहऱ्याने लोभस, डोक्याने तापट आणि लहरी स्वभावाचे मिश्रण!

नागपुरात विषारी सुपारीची तस्करी धडाक्यात सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 11:03 PM

कर्नाटक राज्यात जाणारी ४५ लाख रुपयांची सुपारी पकडण्याच्या प्रकरणानंतर पुन्हा शहरात विषारी सुपारीचा व्यवसाय धडाक्यात सुरू असल्याचा खुलासा झाला आहे. एफडीए आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने संचालित या तस्करीच्या मुख्य सूत्रधाराचा अजूनही थांगपत्ता लागलेला नाही.

ठळक मुद्देन्यायालयाच्या आदेशाकडे कानाडोळाएफडीए उदासीनबेलतरोडी पोलिसांच्या कारवाईने खुलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कर्नाटक राज्यात जाणारी ४५ लाख रुपयांची सुपारी पकडण्याच्या प्रकरणानंतर पुन्हा शहरात विषारी सुपारीचा व्यवसाय धडाक्यात सुरू असल्याचा खुलासा झाला आहे. एफडीए आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने संचालित या तस्करीच्या मुख्य सूत्रधाराचा अजूनही थांगपत्ता लागलेला नाही.न्यायालयाच्या आदेशाकडे कानाडोळा करून विषारी सुपारीची तस्करी धडाक्यात सुरू आहे. कारवाईबाबत एफडीएचे अधिकारी उदासीन आहेत. बेलतरोडी पोलिसांनी सोमवारी रात्री सुपारीचा ट्रक पकडला होता. ट्रकमध्ये २९ टन सुपारी होती. सुपारी गुरू ट्रेडर्सकडून कर्नाटक येथे पाठविण्यात येत होती. भंडारा रोड, ट्रान्सपोर्टनगर येथील मंजूनाथ रोड लाईन्सच्या ट्रकने सुपारी कर्नाटक येथे पाठविण्यात येत होती. याची माहिती पोलिसांना मिळाली होती.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातून दररोज कोट्यवधी रुपयांची विषारी सुपारी दुसऱ्या राज्यात पाठविण्यात येते. या व्यवसायासाठी नागपूर मोठी बाजारपेठ आहे. सुपारीला इंडोनिशियातून आयात करण्यात येते. या सुपारीची विक्री आणि साठवणुकीवर प्रतिबंध आहे. त्यानंतरही एफडीए आणि अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने सुपारी तस्करी करण्यात येत आहे. विषारी सुपारीच्या सेवनाने लोकांना कॅन्सरसारखा गंभीर आजार होत आहे. याची गंभीर दखल घेत यापूर्वी न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर एफडीए, पोलीस आणि अन्य विभागात खळबळ उडाली होती. त्यानंतर सुपारीच्या तस्करीत लिप्त लोकांची धरपकड सुरू झाली. पण काही कारणांमुळे काही दिवसानंतर स्थिती सामान्य झाली.विषारी सुपारीचे गोडाऊन कळमना, लकडगंज, वाडी, हिंगणा, बुटीबोरी ठाण्यांतर्गत असून येथे कोट्यवधी रुपयांची सुपारी ठेवण्यात येते. या गोडाऊनची एफडीए आणि संबंधित विभागाला माहिती आहे, पण कुणीही कारवाई करीत नाही. विषारी सुपारीच्या व्यावसायिकांकडून नेते आणि गुन्हेगार वसुली करतात. याची तक्रार वेळोवेळी करण्यात आली आहे. बेलतरोडी पोलिसांना याची सूचना एका नेत्याने दिली होती. सुपारी व्यापाऱ्यांना संरक्षण देण्यामागे सरकारी विभागातील दलाल काम करीत आहेत. ते व्यापारी आणि अधिकाऱ्यांमध्ये सेतूचे काम करतात. गेल्या काही दिवसांपूर्वी आयकर विभागाने इतवारी येथील खासगी लॉकरवर कारवाई केल्यानंतर सुपारी व्यापारी चर्चेत आले होते. आयकर विभागाच्या चौकशीत बहुतांश लॉकर सुपारी व्यापाऱ्यांचे असल्याचे उजेडात आले होते. लॉकरमध्ये कोट्यवधी रुपये आणि दागिने ठेवले होते.अनेक व्यापाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या नावावर लॉकर घेतले होते. कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर व्यापारी आणि त्यांचे कुटुंबीय लॉकर संचालित करीत आहेत. या कारवाईत सुपारी व्यापाऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. त्यावेळी व्यापाऱ्यांनी सुपारी बोलविणे बंद केले होते.बेलतरोडी पोलिसांच्या कारवाईत पकडण्यात आलेल्या सुपारीचे नमुने एफडीएने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येणार आहे. अनेक वर्षांपासून या गोरखधंद्यात लिप्त व्यापाऱ्यांना अहवालाचा स्रोत माहिती होतो. त्यामुळे अनेकदा अहवाल त्यांच्या बाजूला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

टॅग्स :Smugglingतस्करीPoliceपोलिस