नागपूरचे प्रवासी मुंबई विमानतळावर अडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 23:54 IST2019-09-04T23:52:46+5:302019-09-04T23:54:06+5:30
इंडिगो एअरलाईन्स कंपनीच्या विमानांचा लेटलतिफीचा क्रम अजूनही सुरू आहे. प्रवाशांना सात तास विमानतळावर ताटकळत राहावे लागले. उड्डाणासाठी दुसरे विमान उपलब्ध करून देण्यासाठी प्रवाशांनी मुंंबई विमानतळावर एकच गोंधळ घातला.

नागपूरचे प्रवासी मुंबई विमानतळावर अडकले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंडिगो एअरलाईन्स कंपनीच्या विमानांचा लेटलतिफीचा क्रम अजूनही सुरू आहे. बुधवारी इंडिगोचे पायलट आणि क्रू मेंबर वेळेवर न पोहोचल्यामुळे दुपारी ३.५५ वाजताच्या मुंबई-नागपूर ६ ई ४०३ विमानाने रात्री १०.३० पर्यंत मुंबईहून उड्डाण घेतले नव्हते. प्रवाशांना सात तास विमानतळावर ताटकळत राहावे लागले. उड्डाणासाठी दुसरे विमान उपलब्ध करून देण्यासाठी प्रवाशांनी मुंंबई विमानतळावर एकच गोंधळ घातला.
खराब हवामानामुळे विमान उड्डाण भरू शकत नसल्याचे कारण कंपनीतर्फे सांगण्यात आले. पण देशाच्या विविध शहरात जाणारी अन्य कंपन्यांच्या सात ते आठ विमानांचे उड्डाण झाले. त्यामुळे प्रवासी आणखी संतप्त झाले. कंपनी ऐकत नसल्याचा आरोप प्रवाशांनी केला. यासंदर्भात इंडिगोच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, होऊ शकला नाही. या विमानातून आ. सुधाकर कोहळे, आ. समीर मेघे, आ. विकास कुंभारे आणि मान्यवर प्रवास करणार होते.