शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

नागपूर: पेन्ट्रीकारमध्ये कमी वजनाचे भोजन, मेन्यूकार्डही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 11:08 PM

दपूम रेल्वेच्या नागपूर विभागाचे नवनियुक्त वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आशुतोष श्रीवास्तव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दोन दिवसातच गीतांजली एक्स्प्रेसच्या पेन्ट्रीकारची आकस्मिक पाहणी करून पेन्ट्रीकार व्यवस्थापकाची खरडपट्टी काढली.

ठळक मुद्दे‘आयआरसीटीसी’कडे करणार तक्रारनागपुरात ‘सिनिअर डीसीएम’ची अकस्मात पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेगाडीच्या पेन्ट्रीकारमध्ये ठराविक वजनापेक्षा कमी वजनाचे भोजन पुरविण्यात येत असल्याची तक्रार नेहमीच रेल्वेचे प्रवासी करतात. पेन्ट्रीकारमध्ये स्वच्छतेचा अभाव असतो, कर्मचाऱ्यांजवळ मेन्यूकार्ड नसते अशीही ओरड होते. परंतु रेल्वे प्रशासनावर या तक्रारींचा कोणताच परिणाम होत नाही. प्रवाशांची ही धारणा बदलविण्यासाठी दपूम रेल्वेच्या नागपूर विभागाचे नवनियुक्त वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आशुतोष श्रीवास्तव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दोन दिवसातच गीतांजली एक्स्प्रेसच्या पेन्ट्रीकारची आकस्मिक पाहणी करून पेन्ट्रीकार व्यवस्थापकाची खरडपट्टी काढली. याबाबत ते आयआरसीटीसीकडे तक्रार करणार आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, दपूम रेल्वेचे नवनियुक्त वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आशुतोष श्रीवास्तव यांनी १३ एप्रिलला रेल्वेगाडी क्रमांक १२८५९ गीतांजली एक्स्प्रेसच्या प्रवासादरम्यान अचानक पेन्ट्रीकारचे निरीक्षण केले. त्यांनी स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, इतर प्रवासी सुविधांसह खाद्यपदार्थ, भोजनाचा तसेच नाश्त्याचा दर्जा, वजन आदींची तपासणी केली. यावेळी त्यांना काही त्रुटी आढळल्या. तपासणीत त्यांना पेन्ट्रीकारमध्ये समाधानकारक स्वच्छता दिसली नाही. पेन्ट्रीकार कर्मचाºयांजवळ मेन्यूकार्ड नव्हते. जनता खाना नव्हते. भोजन दिल्यानंतर बिल देण्याची व्यवस्था नव्हती. पेन्ट्रीकार कर्मचाऱ्यांकडून निर्धारित वजनाऐवजी कमी वजनाचे भोजन, नाश्ता देणे आणि त्यासाठी अधिक रक्कम वसूल करण्यात येत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे त्यांनी पेन्ट्रीकार व्यवस्थापकाची चांगलीच खरडपट्टी काढली. याबाबत ते ‘आयआरसीटीसी’कडे तक्रार करणार आहेत.प्रवाशांनी तक्रार करावीदपूम रेल्वे नागपूर विभागाच्या वाणिज्य विभागाने प्रवाशांना रेल्वे हेल्पलाईनच्या माध्यमातून अशा असुविधांबाबत रेल्वे प्रशासनाला माहिती देऊन प्रवासी सेवांचा दर्जा राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.वाणिज्य कर्मचाऱ्यांना सल्लाभविष्यात रेल्वे प्रवाशांना स्वच्छ आणि पौष्टिक आहार ठरवून दिलेल्या दरानुसार उपलब्ध करून देण्याच्या सूचना वाणिज्य विभागाच्या अधिकारी व पर्यवेक्षकांना देण्यात आल्या. सोबतच त्यांना रेल्वे सुविधांचा दर्जा टिकून राहावा यासाठी पेन्ट्रीकारसह इतर प्रवासी सुविधांची नियमित तपासणी करण्याचे निर्देश दिले.‘आयआरसीटीसी’ला देणार अहवाल‘गीतांजली एक्स्प्रेसच्या पेन्ट्रीकारमधील आकस्मिक पाहणीदरम्यान अनेक त्रुटी आढळल्या. पेन्ट्रीकारचे कंत्राट आयआरसीटीसीकडून देण्यात येते. त्यामुळे रेल्वेगाड्यात पुरविण्यात प्रवासी सुविधात त्रुटी राहू नये यासाठी संबंधित कंत्राटदारावर कारवाईसाठी लवकरच याबाबतचा अहवाल छायाचित्रासह ‘आयआरसीटीसी’ला सोपविणार आहोत.- आशुतोष श्रीवास्तव, ‘सिनियर डीसीएम’, दपूम रेल्वे, नागपूर विभाग 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेNagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर