शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

नागपुरात आॅनलाईन ‘टॅक्स’ची वेबसाईट ‘हँग’ : टॅक्स भरायचा कसा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 1:04 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : डिसेंबर महिन्यात संपत्ती कर वसुली जोरात सुरू आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी आॅनलाईन कर भरण्याची व्यवस्था ...

ठळक मुद्देकधी ‘लिंक’ची समस्या तर कधी कॉलम उघडत नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डिसेंबर महिन्यात संपत्ती कर वसुली जोरात सुरू आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी आॅनलाईन कर भरण्याची व्यवस्था मनपाच्या संपत्ती विभागाने केली आहे. कर भरण्याच्या प्रक्रियेला वेग येताच आॅनलाईन व्यवस्थेत तांत्रिक बिघाड होत आहे. अनेकदा संगणक हँग होत आहे, तर कधी लिंक होण्याच्या समस्येमुळे नागरिकांना त्रास होत आहे.सकाळी आणि रात्री आॅनलाईन कर भरणा करताना अनेक अडचणी येत आहेत. मनपाच्या अधिकृत वेबसाईटवर कर भरण्याचा कॉलम उघडत नाही आणि जर उघडला तर बिल भरण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही.लोकमतकडे या संदर्भात अनेक तक्रारी आल्या आहेत. मंगळवारी झोनमधील एका करदात्याने सांगितले की, शुक्रवारी सकाळी ८ वाजता कर भरण्याची आॅनलाईन प्रक्रिया सुरू केली, तेव्हा संगणक हँग झाला. अनेक प्रयत्नानंतरही प्रक्रिया पूर्ण झाली नाही. दुपारी प्रयत्नानंतर कर भरला. लकडगंज झोनमध्येसुद्धा करदात्यांनी समस्या येत असल्याची तक्रार केली. डिसेंबर महिन्यात जर अशी स्थिती आहे तर पुढे काय होईल, याचा अंदाज येतो. कर विभागाला आॅनलाईन व्यवस्था चोख ठेवण्यासाठी दक्ष राहावे लागेल.प्राप्त माहितीनुसार, आॅनलाईन कर भरण्यासाठी मनपाने एचडीएफसी आणि बिल्डेक्सला गेटवे दिला आहे. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, एनएएफटी, आरटीजीएसच्या माध्यमातून आॅनलाईन कर भरता येतो. पेटीएम व अन्य आॅनलाईन अ‍ॅपच्या माध्यमातून मनपाचा संपत्ती कर भरता येत नाही. आतापर्यंत १२२ कोटींचा संपत्ती कर वसूल केला असून ५०९ कोटींचे लक्ष्य दिले आहे. आतापर्यंत ४.३० लाख डिमांड नोट जारी करण्यात आले आहेत.संपत्ती कर विभागाचे सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम यांनी सांगितले की, आॅनलाईन कर भरण्यात समस्या असल्याची तक्रार मिळालेली नाही. जर कुणी मोबाईल वा संगणकाच्या माध्यमातून कर भरीत असेल आणि त्यावेळी नेटवर्क नसेल तर समस्या येऊ शकते. मनपाच्या आॅनलाईन व्यवस्थेत कोणतीही समस्या नाही.१४ दिवसानंतर सहायक आयुक्तांना नोटीसस्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी संपत्ती कराची समाधानकारक वसुली न झाल्याने नाराजी व्यक्त केली होती. १ डिसेंबरला स्थायी समितीच्या बैठकीत दहाही झोनच्या सहायक आयुक्तांना नोटीस जारी करण्याचे निर्देश दिले होते. तब्बल १४ दिवसानंतर अपर आयुक्तांच्या स्वाक्षरीने शुक्रवार कारणे दाखवा नोटीस जारी करून तीन दिवसांत कमी कर वसुलीवर उत्तर मागितले आहे.

टॅग्स :onlineऑनलाइनTaxकर