शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
3
"हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
4
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
5
तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
6
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
7
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
8
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
9
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
10
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
11
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
12
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
13
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
14
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
15
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
16
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
17
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' विषयी अभिजीतचा मोठा खुलासा; म्हणाला, 'तुम्ही संधी दिली पण...'
18
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
19
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
20
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."

नागपुरात बैलाच्या हल्ल्यात वृद्धाचा बळी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 11:58 PM

कॉटन मार्केट चौक येथील शंकर विलास भोजनालयासमोर मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास जयश्री टॉकीज परिसरातील रहिवासी मुरलीधर आबाजी दातारकर (५८) यांच्यावर बैलाने हल्ला चढविला. त्यांना धडक देऊ न खाली पाडले तसेच पायांनी त्यांच्यावर हल्ला केला. यात दातारकर गंभीर जखमी झाले. उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

ठळक मुद्देकॉटन मार्केट येथील घटना : मोकाट जनावरे सोडणाऱ्यांवर कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कॉटन मार्केट चौक येथील शंकर विलास भोजनालयासमोर मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास जयश्री टॉकीज परिसरातील रहिवासी मुरलीधर आबाजी दातारकर (५८) यांच्यावर बैलाने हल्ला चढविला. त्यांना धडकदेऊ न खाली पाडले तसेच पायांनी त्यांच्यावर हल्ला केला. यात दातारकर गंभीर जखमी झाले. उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.मुरलीधर दातारकर यांच्यावर बैल हल्ला करीत असताना या मार्गावर वर्दळ होती. परंतु बैलाच्या भीतीमुळे कुणीही त्यांच्या मदतीला आले नाही. एका ओळखीच्या महिलेने दातारकर यांच्या कुु टुंबीयांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीय लगेच घटनास्थळी पोहचले. जखमी अवस्थेतील दाताकर यांना उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचरापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. मेयो पोलीस चौकीने गणेशपेठ पोलिसांना याची सूचना दिली. तसेच महापालिकेलाही या घटनेची माहिती दिली. त्यानंतर कोंडवाडा विभागाच्या पथकाने बैलाला पकडून कोंडवाड्यात टाकले.कॉटन मार्केट परिसरात मोकाट जनावरांची दहशत आहे. रस्त्यांवरुन ये-जा करणाऱ्यांवर ते हल्ला चढवितात. जनावरांमुळे वाहनांचे अपघात घडतात. जनावरे मोकाट सोडणाऱ्या गोपालकांच्या विरोधात कारवाई करण्यासंदर्भात परिसरातील नागरिकांनी अनेकदा पोलीस विभाग व महापालिका यांच्याकडे तक्रारी केल्या. परंतु प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नाही. शहर पोलिसांनी सहा महिन्यापूर्वी मोकाट जनावरे सोडणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता. मात्र पोलिसांनी अद्याप एकाही गोपालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला नाही. गणेशपेठ पोलिसांनी या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान नागरिकांनी मोकाट जनावरे सोडणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

टॅग्स :Cotton Market, Nagpurकॉटन मार्केटnagpurनागपूर