शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मनपात पकोड्यावरून राजकारण तापले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 00:09 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पकोडे विकणे हाही रोजगार असल्याबाबतचे वक्तव्य केल्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत देशभरात आंदोलन करीत आहेत. नागपूर महापालिकेतही या मुद्यावरून विरोधकांनी सत्तापक्षाला कोंडीत पकडण्याची तयारी सुरू केली आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसचे संदीप सहारे यांचा प्रस्ताव : बेरोजगारांना पकोडा स्टॉलसाठी जागा उपलब्ध करा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पकोडे विकणे हाही रोजगार असल्याबाबतचे वक्तव्य केल्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत देशभरात आंदोलन करीत आहेत. नागपूर महापालिकेतही या मुद्यावरून विरोधकांनी सत्तापक्षाला कोंडीत पकडण्याची तयारी सुरू केली आहे. काँग्रेसचे नगरसेवक संदीप सहारे यांनी मुंबई प्रांतिक महानगरपालिका (सुधारित) व नागपूर शहर महापालिका (निरसन) अधिनियम २०११ मधील कलम ४४ अन्वये प्रश्न उपस्थित करून शहरातील बेरोजगारांना पकोड्याचा व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी निगम सचिव हरीश दुबे यांना सोमवारी पत्र दिल्याने सत्तापक्षात खळबळ उडाली आहे.सहारे यांचे पत्र प्राप्त होताच सभागृहात हा विषय चर्चेला येणार नाही. यासाठी सत्तापक्ष सक्रिय झाला आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रश्न विचारावयाचा झाल्यास सात दिवसाआधी देणे अपेक्षित आहे. २०फे ब्रुवारीला सभागृह आहे. सहारे यांचा प्रश्न सात दिवसाआधी आल्याने सचिवांना तो नाकारता येणार नाही. त्यामुळे प्राथमिकतेच्या आधारावर हा प्रश्न नाकारण्याची शक्यता आहे.भाजपाचे काही ज्येष्ठ नगरसेवक यासाठी कामाला लागले आहे. नागपूर शहरात बेरोजगारांची संख्या मोठी आहे. त्यांना रोजगार करता यावा यासाठी महापालिकेच्या खाली जागा, बाजारातील जागा वा फुटपाथ उपलब्ध करावे अशी सहारे यांची मागणी आहे.जिल्ह्यात दोन लाख बेरोजगारकामाच्या शोधात असणाऱ्या व्यक्तींना रोजगार व स्वयंरोजगारासाठी समुपदेशन, मार्गदर्शन व मदत करण्यासाठी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. नागपूर जिल्ह्यातून (शहर व ग्रामीण) तब्बल २ लाख १ हजार ४०७ जणांनी बेरोजगार असल्याची नोंद नागपुरातील मार्गदर्शन केंद्रात केली आहे. यात ७१ हजार ६७२ महिलांचाही समावेश आहे़. ३१ डिसेंबर २०१७ पर्यंतची ही आकडेवारी आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसagitationआंदोलन