Nagpur News: नीती आयोगाची २२ फेब्रुवारी रोजी नागपुरात बैठक

By आनंद डेकाटे | Published: February 19, 2024 03:05 PM2024-02-19T15:05:49+5:302024-02-19T15:06:09+5:30

- आनंद डेकाटे   नागपूर - जी-२० नंतर आता नॅशनल इंस्टिट्युशन फॉर ट्रांसफॉर्मिंग इंडियाची (नीती आयोग) बैठक २२ फेब्रुवारीला नागपुरात ...

Nagpur News: Niti Aayog meeting in Nagpur on February 22 | Nagpur News: नीती आयोगाची २२ फेब्रुवारी रोजी नागपुरात बैठक

Nagpur News: नीती आयोगाची २२ फेब्रुवारी रोजी नागपुरात बैठक

- आनंद डेकाटे  
नागपूर - जी-२० नंतर आता नॅशनल इंस्टिट्युशन फॉर ट्रांसफॉर्मिंग इंडियाची (नीती आयोग) बैठक २२ फेब्रुवारीला नागपुरात होणार आहे. इंडियन इंस्टिट्युट ऑफ मॅनेजमेंटमध्ये (आयआयएम)येथे ही बैठक होणार असल्याचे सांगितले जाते.

नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के. पॉल यांच्या अध्यक्षतेत ही बैठक होणार आहे. या बैठकीला देशभरातील सचिव दर्जाचे अधिकारी हजेरी लावतील. बैठकीत ‘रि इमेजिंग आयसीडीएस फॉर २०३०’ यावर विषयावर चर्चा होणार आहे. अंगणवाड्यांच्या माध्यमातून महिला व बालकांसाठी अनेक महत्त्वाच्या योजना राबवण्यात येते. कुपोषण एक मोठ समस्या असून त्यावर मात करण्यासाठी अंगणवाडी महत्त्वाचा घटक आहे. शिवाय ग्रामीण भागात शिक्षणाची पहिली पायरीच या अंगणवाडीतून सुरू होते. त्यामुळे या अधिक दर्जेदार,सक्षम करण्यावर सरकारचा भर आहे. नीती आयोगाच्या बैठकीत यावर मंथन होणार असल्याचे समजते.

Web Title: Nagpur News: Niti Aayog meeting in Nagpur on February 22

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.