शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

नागपूर-नागभीड ‘ब्रॉडगेज’ला महागाईचे इंजिन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 01:49 IST

तीन वर्षांपूर्वी ३७६.२१ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित असलेल्या नागपूर-नागभीड ब्रॉडगेज प्रकल्पाला सध्या ७०८.११ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

ठळक मुद्देप्रकल्पाचा खर्च ३७६.२१ वरून ७०८.११ कोटींवर : तरी राज्य सरकार देणार ५० टक्के वाटा

जितेंद्र ढवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तीन वर्षांपूर्वी ३७६.२१ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित असलेल्या नागपूर-नागभीड ब्रॉडगेज प्रकल्पाला सध्या ७०८.११ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यासंदर्भात रेल्वे मंत्रालयाने पाठविलेल्या या प्रकल्पाच्या ७०८.११ कोटी रुपयांच्या सुधारित अंदाजपत्रकास हिरवी झेंडी दाखवीत राज्य सरकारने ५० टक्के आर्थिक भार उचलण्याचा निर्णय घेतला आहे.राज्यातील रखडलेल्या प्रकल्पांना जलदगती मिळावी, यासाठी राज्य सरकारचा आर्थिक सहभाग मिळणे गरजेचे आहे. त्यानुसार गत काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नागपूर-नागभीड या ११६.१५ कि.मी. अंतराचा रेल्वेमार्ग ‘नॅरोगेज’वरून ‘ब्रॉडगेज’मध्ये रूपांतरित करण्यास सरकारने संमती दर्शविली आहे. या प्रकल्पात ५० टक्के आर्थिक सहभाग देण्याचा निर्णय राज्य सरकारने २०१३ मध्ये घेतला होता. त्यावेळी प्रकल्पाचा अंदाजित खर्च ३७६.२१ कोटी रुपये होता. यात राज्याचा वाटा १८८.११ कोटी रुपये इतका होता. मात्र मध्यल्या काळात नागपूर-नागभीड ब्रॉडगेजची गाडी अडली होती. ती पुन्हा रुळावर आणण्याचे प्रयत्न रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकारकडून झाले. त्यानुसार रेल्वे मंत्रालयाने १३ आॅगस्ट २०१६ रोजी या प्रकल्पाचे ७०८.११ कोटी रुपयांचे सुधारित अंदाजपत्रक राज्य सरकारकडे पाठविले होते. महागाई आणि भूसंपादनात लागणाºया खर्चामुळे तीन वर्षांत प्रकल्पाचा खर्च वाढला. मात्र या प्रकल्पाचे आर्थिक, सामाजिक आणि नक्षल समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी होणारे महत्त्व लक्षात घेता सरकारने सुधारित अंदाजपत्रकाला मंजुरी दिली आहे.असा होईल ‘ब्रॉडगेज’ प्रकल्पनागपूर-नागभीड ‘ब्रॉडगेज’ प्रकल्पाच्या ७०८.११ कोटी रुपयांच्या सुधारित खर्चापैकी राज्याच्या वाट्याला येणारा ३५४.०५५ कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारला टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येईल.राज्याच्या वाट्याची रक्कम २०१८-१९ या वर्षांपासून केंद्र सरकारच्या निधीच्या समप्रमाणात उपलब्ध करून देण्यात येईल.या प्रकल्पाच्या खर्चात भूसंपादनाचा खर्च अंतर्भूत करण्यात येईल.