शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
7
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
8
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
9
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
10
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
11
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
12
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
13
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
14
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
16
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
17
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
18
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
19
विना नंबरप्लेटच्या भरधाव पोर्शे गाडीने तरुण तरुणीला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना
20
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती

नागपूर मनपाची कचरा प्रक्रिया बंद ; हंजरला बजावली नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 10:51 PM

स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून महापालिका विविध उपक्रम राबवित आहे. परंतु भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प गेल्या दीड महिन्यापासून बंद आहे. या संदर्भात महापालिकेच्या संबंधित विभागाला माहिती नव्हती. ‘लोकमत’ ने या संदर्भात वृत्त प्रकाशित करून भांडेवाडीचे वास्तव पुढे आणले. याची दखल घेत महापालिका प्रशासनाने मे. हंजर बायोटेक एनर्जीला नोटीस बजावून खुलासा मागितला आहे.

ठळक मुद्देलोकमतचा प्रभाव : प्रभावी उपाययोजना करण्याचे आयुक्तांचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून महापालिका विविध उपक्रम राबवित आहे. परंतु भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प गेल्या दीड महिन्यापासून बंद आहे. या संदर्भात महापालिकेच्या संबंधित विभागाला माहिती नव्हती. ‘लोकमत’ ने या संदर्भात वृत्त प्रकाशित करून भांडेवाडीचे वास्तव पुढे आणले. याची दखल घेत महापालिका प्रशासनाने मे. हंजर बायोटेक एनर्जीला नोटीस बजावून खुलासा मागितला आहे.सध्या शहरातील १२०० मेट्रिक टन कचरा येथे आणला जातो. यातील २०० मेट्रिक टन कचऱ्यावर मे. हंजर बायटेक एनर्जी माध्यमातून प्रक्रिया केली जाते. परंतु सध्या प्रक्रिया न करताच कचरा साठविला जात आहे. याबाबतचे वृत्त प्रकाशित होताच पेंच प्रकल्प व आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना बोलावून अपर आयुक्त रवींद्र कुंभारे यांनी माहिती जाणून घेतली. प्रक्रिया बंद असल्याबाबत विचारणा करून करारानुसार नोटीस बजावण्याचे आदेश त्यांनी दिले.हंजरच्या कामकाजासंदर्भात तक्रारी आहेत. यापूर्वी कंपनीवर दोन कोटींचा दंडही आकारण्यात आल्याची माहिती आयुक्त अश्विन मुदगल यांनी दिली. वीज बिल न भरल्याने प्रकल्प बंद असल्याची माहिती आहे. याबाबत कंपनीला खुलासा मागितला आहे. कंपनीचे काम व्यवस्थित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास कंपनीवर कठोर कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला.प्रक्रि या बंद असल्याने भांडेवाडी येथे कचऱ्याचा ढीग लागलेला नाही. येथे भरपूर जागा आहे. महिनाभरात कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प सुरू केला जाणार आहे. यात ८०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येईल. यातून ११.५ मेगावॅट वीज निर्मिती होईल. या प्रकल्पामुळे कचऱ्याची समस्या मार्गी लागणार आहे. कचऱ्यापासून तयार होणाऱ्या  खताबाबत फर्टिलायजर कार्पोरेशन आॅफ इंडिया यांच्याशी महापालिका व हंजर यांनी त्रिपक्षीय करार केला आहे. हंजरने काम बंद केल्यास निर्माण होणाऱ्या  खताची विक्री करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कचरामुक्त शहराचा संकल्प आहे. बायोमायनिंगचाही प्रस्ताव आहे. लवकरच याचे चांगले परिणाम दिसतील असा विश्वास अश्विन मुदगल यांनी व्यक्त केला.करारानुसार कारवाई करूकचऱ्यावरील प्रक्रिया अचानक बंद ठेवणे चुकीचे आहे. हंजर कंपनीला महापालिकेकडून आवश्यक सहकार्य मिळत आहे. करारानुसार हंजरवर कारवाई केली जाईल. सोबतच एस्सेल कंपनीचा कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प लवकरच कार्यान्वित केला जाईल. यामुळे ८०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया होईल.नंदा जिचकार, महापौरसहा महिन्यात कचऱ्यातून सुटकाभांडेवाडी येथील कचऱ्याची समस्या कायमस्वरुपी निकाली निघावी. यासाठी कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. महिनाभरात हा प्रकल्प सुरू होईल. तसेच बायोमायनिंगची निविदा प्रक्रिया सुरू आहे. दोन्ही प्रकल्प कार्यान्वित होतील. पुढील सहा महिन्यात पूर्व नागपुरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.संदीप जोशी , सत्तापक्षनेते महापालिकास्वच्छ भारत अभियान निव्वळ देखावास्वच्छ भारत अभियानाच्या नावाखाली कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. परंतु स्वच्छता होताना दिसत नाही. स्वच्छ अभियान हा निव्वळ देखावा आहे. भांडेवाडी डम्पिंगयार्ड येथील कचरा प्रक्रिया दीड महिन्यापासून बंद आहे. परंतु महापालिकेला याची माहिती नाही. स्वच्छता सर्वेक्षणादरम्यान प्रकल्प सुरू होता. नंतर बंद करण्यात आला.तानाजी वनवे, विरोधीपक्षनेता महापालिकाआरक्षणाच्या विरोधात वापरभांडेवाडी येथील जमीन कंपोस्टखत निर्माण करण्यासाठी आरक्षित आहे. परंतु या जागेच्या मागील अनेक वर्षापासून डम्पिंगयार्ड म्हणून वापर केला जात आहे. दुर्गंधी व अस्वच्छतेमुळे या भागातील नागरिक त्रस्त आहेत. वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. सर्वसामान्यांना आंदोलनासाठी प्रवृत्त केले जात आहे. महापालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.दुनेश्वर पेठे, गटनेते राष्ट्रवादी काँग्रेस

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाdumpingकचरा