शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
6
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
7
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
8
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
9
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
10
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
11
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
12
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
13
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
14
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
15
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
16
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
17
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
18
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
19
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
20
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...

नागपूर मनपा शाळेचा निकाल ७४ टक्के 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2018 9:22 PM

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यामिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालामध्ये नागपूर महापालिकेच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. महापालिकेच्या शाळांचा निकाल ७४ टक्के इतका लागला आहे. महापौर नंदा जिचकार यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करीत कौतुक केले.

ठळक मुद्देगुणवंत विद्यार्थ्यांचा महापौरांच्या हस्ते सत्कार : मनोज यादव ९१.२० टक्क्यांसह प्रथम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यामिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालामध्ये नागपूर महापालिकेच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. महापालिकेच्या शाळांचा निकाल ७४ टक्के इतका लागला आहे. महापौर नंदा जिचकार यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करीत कौतुक केले.यावेळी विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, उपसभापती प्रमोद तभाने, उपनेत्या वर्षा ठाकरे, धंतोली झोन सभापती विशाखा बांते, नेहरूनगर झोन सभापती रिता मुळे, शिक्षण समिती सदस्य स्नेहल बिहारे, राजेंद्र सोनकुसरे, भारती बुंडे, नगरसेविका वंदना भगत, मनीषा कोठे, नगरसेवक किशोर जिचकार, उपायुक्त डॉ.रंजना लाडे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी महापौर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत त्यांना तुळशीचे रोपटे भेट म्हणून दिले. विद्यार्थ्यांच्या पुढील भविष्यासाठी त्यांना शुभेच्छाही दिल्या. मागील वर्षीच्या प्रमाणात मनपाच्या शाळेचा निकाल यावर्षी वाढला असल्याने त्यांनी शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार आणि त्यांच्या सर्व शिक्षकांचे कौतुक केले.गुणवंत विद्यार्थ्यांमंध्ये मराठी माध्यमातून कु.कोमल गणेश अलोणे, दुर्गानगर माध्यामिक शाळा (९०.६०%), दिव्या मिलिंद नरांजे, दुर्गानगर माध्यामिक शाळा (९०%), भूषण नरेश हर्षे, जयताळा माध्यामिक शाळा (८८.४०%), हिंदी माध्यामातून मनोज राधेश्याम यादव, कपिलनगर माध्यामिक शाळा (९१.२०%), कीर्ती बिरपाल वर्मा, संजयनगर शाळा (९०.६०%), बिसमणी महेश धुर्वे, विवेकानंदनगर शाळा (८८.२०%), उर्दू माध्यामिक शाळेतून समरीन बानो, गरीब नवाज उर्दु (८६%), इकरा शहरीश आबीदखान, एम.के.आझाद (८६%), अलकीया अंजूम अ.रशीद, एम.के.आझाद (८५%), उन्मुलकुश मो.अंसारी, एम.के.आझाद (८५%), मागासवर्गीयातून दुर्गानगर माध्यामिक शाळेचा दिव्या मिलिंद नरांजे याला ९० टक्के प्राप्त झाले. दिव्यांगामधून डॉ.बाबासाहेब आंबेडकर शाळेचा प्रमोद चौधरी या विद्याथ्यार्ला ७४.८० टक्के प्राप्त झाले आहे. कार्यक्रमाचे संचालन सहायक शिक्षणाधिकारी कुसुम चाफलेकर यांनी केले. आभार संध्या इंगळे यांनी मानले.

टॅग्स :SSC Results 2018दहावी निकाल २०१८Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका