अवैध बांधकाम व जीर्ण झालेल्या दुकानांवर मनपाचा हातोडा
By मंगेश व्यवहारे | Updated: April 12, 2023 13:50 IST2023-04-12T13:41:32+5:302023-04-12T13:50:28+5:30
रस्त्याच्या दोन्ही बाजूचे फूटपाथ वर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविले

अवैध बांधकाम व जीर्ण झालेल्या दुकानांवर मनपाचा हातोडा
नागपूर : महापालिकेच्या प्रवर्तन विभागाने शहरातील विविध भागातील अवैध बांकामावर हातोडा चालविला आहे. धरमपेठ झोन अंतर्गत गांधीनगर पुष्पराज अपार्टमेंट येथील अवैध पद्धतीने बांधकाम केलेल्या घराच्या ४ भिंती तोडल्या. तर धंतोली झोन अंतर्गत जीर्ण झालेल्या दुकानांनाही तोडण्यात आले.
त्याचबरोबर लक्ष्मीनगर झोन अंतर्गत आठ रस्ता चौक ते लंडन स्ट्रीट, दीक्षाभूमी ते जयताळा पुढे हिंगणा टी-पॉईंटपर्यंत अतिक्रमण कारवाई करण्यात आली. ज्यामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूचे फूटपाथ वर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले.
सतरंजीपुरा झोन अंतर्गत दहीबाजार पुल ते भंडारा रोडपर्यंत कारवाई करण्यात आली. आशीनगर झोन अंतर्गत वैशालीनगर ते एनआयटी ऑफिस ते मेहंदीबाग रोड ते दुर्गावती चौक कारवाई करण्यात आली. ही कारवाई उपायुक्त अशोक पाटील, प्रवर्तन अधिकारी संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.