शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

नागपूर मनपाच्या अपूर्व विज्ञानाचा प्रवास पोहचला राज्यभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 22:52 IST

पडक्या व मोडकळीस आलेल्या इमारती, अस्वच्छता, नीरस वातावरण, पगार मिळतोय म्हणून काम करणारे शिक्षक, अशी दुर्लक्षित भावना मनपाच्या शाळेप्रति समाजाची आहे. पण मनपाचे काही शिक्षक समाजाचा दृष्टिकोन बदलविण्याचा मनापासून प्रयत्नात आहे. आहे त्या परिस्थितीत गुणवंत विद्यार्थी घडविता येतील, या दृष्टिकोनातून मनपाच्या तीन शिक्षिकांनी अप्रतिम कार्य केले आहे. या शिक्षिकांच्या प्रयत्नातून मनपाच्या अपूर्व विज्ञान मेळाव्याला राज्य शासनाकडून मान्यता मिळाली आहे. या तीन शिक्षिकांनी राज्यभरातील विज्ञान शिक्षकांना विज्ञानाच्या अध्यापनाची दृष्टी दिली आहे. त्यांच्या प्रयत्नातून मनपाचे नाव राज्यात आणि राष्ट्रीय स्तरावर पोहचले आहे.

ठळक मुद्देतीन शिक्षिकांनी दिली राज्यातील हजारो शिक्षकांना दृष्टी : विद्यार्थ्यांच्या मॉडेलचीही सातत्याने होत आहे राष्ट्रीय स्तरावर निवड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पडक्या व मोडकळीस आलेल्या इमारती, अस्वच्छता, नीरस वातावरण, पगार मिळतोय म्हणून काम करणारे शिक्षक, अशी दुर्लक्षित भावना मनपाच्या शाळेप्रति समाजाची आहे. पण मनपाचे काही शिक्षक समाजाचा दृष्टिकोन बदलविण्याचा मनापासून प्रयत्नात आहे. आहे त्या परिस्थितीत गुणवंत विद्यार्थी घडविता येतील, या दृष्टिकोनातून मनपाच्या तीन शिक्षिकांनी अप्रतिम कार्य केले आहे. या शिक्षिकांच्या प्रयत्नातून मनपाच्या अपूर्व विज्ञान मेळाव्याला राज्य शासनाकडून मान्यता मिळाली आहे. या तीन शिक्षिकांनी राज्यभरातील विज्ञान शिक्षकांना विज्ञानाच्या अध्यापनाची दृष्टी दिली आहे. त्यांच्या प्रयत्नातून मनपाचे नाव राज्यात आणि राष्ट्रीय स्तरावर पोहचले आहे.सुरेंद्रगड हिंदी हायस्कूलच्या दीप्ती चंदनसिंग बिस्ट, दुर्गानगर हायस्कूलच्या ज्योती मिलिंद मेडपिलवार व बॅरि. शेषराव वानखेडे विद्यानिकेतन व वाल्मिकीनगर हिंदी माध्यमिक हायस्कूलच्या पुष्पलता रवींद्र गावंडे या तीन शिक्षिका खऱ्या अर्थाने मनपासाठी आदर्श आहे. विज्ञानाच्या या तीन शिक्षिका १९९८ पर्यंत पारंपरिक पद्धतीने अध्यापनाचे कार्य करीत होत्या. परंतु सुरेश अग्रवाल यांनी राबविलेल्या विज्ञानाच्या उपक्रमातून त्यांना दृष्टी मिळाली. विज्ञान कसे शिकवावे, कसे समजून घ्यावे यातील बारकावे त्यांनी अध्यापनाचे नियमित काम करताना त्यांनी अवगत केले. आणि आपल्या कल्पकतेतून विज्ञानाचे शेकडो प्रयोग तयार केले तेही टाकावू वस्तूपासून. सोबतच विज्ञान शिकविण्याच्या पद्धतीत थोडी रंजकता आणली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाप्रति गोडी निर्माण झाली. हळुहळू शाळेशाळेतून विद्यार्थी जुळू लागले. यातून अपूर्व विज्ञान मेळाव्याची संकल्पना रुजली. ‘नो कॉस्ट, लो कॉस्ट’, ‘लॅब इन कॅरिबॅग’ या संकल्पना त्यांनी आपल्या कल्पकतेने फुलविली. दरवर्षी अपूर्व विज्ञान मेळाव्या या शिक्षिकांच्या नेतृत्वात साजरा होऊ लागला. २०१५ मध्ये या मेळाव्याला तत्कालीन शिक्षण सचिव नंदकुमार व शिक्षण विभागाच्या तत्कालीन ओएसडी प्राची साठे यांनी भेट दिली. चार तास त्यांनी मेळाव्यात घालविले. विद्यार्थ्यांच्या प्रयोगाचे निरीक्षण केले. शिक्षकांशी चर्चा केली. अपूर्व विज्ञान मेळाव्याची ही संकल्पना राज्यभर राबविण्यासाठी त्यांनी २०१५ मध्ये शासन निर्णय काढला. तेव्हापासून राज्यभरातील शाळांमध्ये मनपाचा अपूर्व विज्ञान मेळावा साजरा होत आहे. यांची प्रयोगशाळा वर्गात येतेविज्ञानाची प्रयोगशाळा म्हटले की काचेची उपकरणे, मायक्रोस्कोप, विज्ञानाच्या प्रयोगाचे साहित्य असे चित्र डोळ्यापुढे येते. परंतु या शिक्षिकांनी तयार केलेली प्रयोगशाळा कॅरीबॅगमध्ये येते. एरवी प्रयोगशाळेमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जावे लागतात. परंतु या शिक्षिकांनी तयार केलेली प्रयोगशाळा वर्गात घेऊन जाता येते. ‘लॅब इन कॅरीबॅग’ अशी ती संकल्पना आहे. खेळण्यातून सांगतात विज्ञानाचे सिद्धांतभौतिकशास्त्राचा जडत्वाचा सिद्धांत थेअरीमध्ये दोन पानांचा आहे. बरेचदा वाचल्यानंतरही तो विद्यार्थ्यांच्या लक्षात राहत नाही. पण एक पेन्सिल आणि रुपयाच्या कलदारवर इतक्या सहजपणे सांगितल्या जातो की विद्यार्थी आयुष्यभर विसरू शकत नाही. संवेग अक्षयतेचा सिद्धांत खेळण्यातील कंच्याद्वारे विद्यार्थ्यांना शिकविला जातो. असे ३०० हून अधिक विज्ञानाचे सिद्धांत या शिक्षिकांनी प्लास्टिक बॉटल, झाकण, कागद, खेळणी, सिरींज, रिकाम्या रिफील, पेन, सेल, टायर, हेअर पिन या माध्यमातून विद्यार्थ्यांपुढे मांडले आहेत. पाठ्यपुस्तक मंडळाने घेतली दखलशासनाने ज्ञानरचना वाद ही संकल्पना २०१० मध्ये रुजविली. परंतु या शिक्षिका २००० पासून मनपाच्या शाळेत त्या संकल्पनेवर काम करीत होत्या. शासनाने त्यांच्या कल्पकतेची दखल घेऊन त्यांची राज्यस्तरावर रिसोर्स पर्सन म्हणून निवड केली. पाठ्यपुस्तक मंडळाने त्यांच्या प्रयोगांचा समावेश पाठ्यपुस्तकात केला. या शिक्षिकांच्या मार्गदर्शनात मनपाच्या विद्यार्थ्यांचे विज्ञानाचे मॉडेल सातत्याने राष्ट्रीय स्तरावर निवडले जात आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाTeacherशिक्षक