लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे प्रशासनाने नागपूर-मुंबई आणि मुंबई नागपूर दुरांतो एक्स्प्रेसमध्ये जुन्या कोचऐवजी एलएचबी कोच लावले आहेत. परंतु एलएचबी कोच लावल्यानंतर दोन दिवसातच त्यात तांत्रिक बिघाड असल्याचे स्पष्ट झाले आहे. या गाड्यांमधील पंखे, चार्जिंग पॉईंट बंद असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.रेल्वेगाडी क्रमांक १२२८९ मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेस मंगळवारी २६ फेब्रुवारीला नागपूरसाठी छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून रवाना झाली. गाडी सुटताच एस ६ कोचमधील सर्व पंखे आणि मोबाईल चार्जिंग पॉईंट बंद असल्याचे लक्षात आले. या कोचमधील प्रवासी मनोज बंड यांच्यासह इतर प्रवाशांनी कोचमधील टीटीईला तक्रार केली. टीटीईने इगतपुरीला दुरुस्त करण्यात येणार असल्याचे सांगितले. परंतु ही गाडी नागपूरला पोहोचेपर्यंत यातील पंखे आणि चार्जिंग पॉईंट सुरु झाले नाही. याबाबत रेल्वेचे मेकॅनिक प्रमोद उईके यांच्याशी संपर्क साधला असता ते केवळ पाहणी करून निघून गेले. एस ६ कोचमध्ये बर्थ क्रमांक ७३ जवळील खिडकी इतकी जाम झाली होती की ती उघडत नव्हती. यामुळे प्रवाशांना गरमीत प्रवास करावा लागला. या कोचमध्ये ज्येष्ठ नागरिक प्रवास करीत होते. या गाडीच्या कोचमध्ये ८० बर्थ आहेत. परंतु बेडरोल ठेवण्यासाठी जागा देण्यात आली नाही. यामुळे बर्थ क्रमांक ७९ वर बेडरोल ठेवल्यामुळे प्रवाशांना बसण्यास त्रास झाला.
नागपूर-मुंबई दुरांतोच्या नव्या एलएचबी कोचमध्ये प्रवाशांना त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 12:26 IST
रेल्वे प्रशासनाने नागपूर-मुंबई आणि मुंबई नागपूर दुरांतो एक्स्प्रेसमध्ये जुन्या कोचऐवजी एलएचबी कोच लावले आहेत. परंतु एलएचबी कोच लावल्यानंतर दोन दिवसातच त्यात तांत्रिक बिघाड असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नागपूर-मुंबई दुरांतोच्या नव्या एलएचबी कोचमध्ये प्रवाशांना त्रास
ठळक मुद्देपंखे, चार्जिंग पॉईंट बंद असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय