शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

नागपुरात मोबाईल हिसकावून धूम स्टाईल पळणारा जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 12:10 AM

मोबाईलवर बोलत जात असलेल्यांच्या कानाचा मोबाईल हिसकावून धूमस्टाईल पळून जाणाऱ्या आरोपींचा छडा लावण्यात गिट्टीखदान पोलिसांनी अखेर यश मिळवले. सानिध्य ऊर्फ दादू जयभारत सोमकुंवर (वय १९) असे यातील एका आरोपीचे नाव असून तो योगेश्वरनगर, दिघोरी येथे राहतो. त्याचा दुसरा साथीदार अल्पवयीन आहे.

ठळक मुद्देसहा गुन्ह्यांची कबुली : १७ मोबाईल, मोटरसायकल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मोबाईलवर बोलत जात असलेल्यांच्या कानाचा मोबाईल हिसकावून धूमस्टाईल पळून जाणाऱ्या आरोपींचा छडा लावण्यात गिट्टीखदान पोलिसांनी अखेर यश मिळवले. सानिध्य ऊर्फ दादू जयभारत सोमकुंवर (वय १९) असे यातील एका आरोपीचे नाव असून तो योगेश्वरनगर, दिघोरी येथे राहतो. त्याचा दुसरा साथीदार अल्पवयीन आहे.सुरेंद्रगड, गिट्टीखदानमधील रहिवासी अभिषेक संतोष मडावी (वय २४) १ नोव्हेंबरच्या रात्री ८.३० वाजता काम आटोपून आपल्या घरी पायी जात होते. रस्त्याने जाताना ते मोबाईलवर बोलत होते. अचानक पल्सरवर आलेल्या दोन लुटारूंनी मडावींच्या कानाला लावलेला मोबाईल हिसकावून घेतला आणि सुसाट वेगाने पळून गेले. काही क्षणासाठी काय झाले, ते मडावींना कळलेच नाही. दुचाकीस्वार आरोपींनी आपला मोबाईल हिसकावून नेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी आपल्या मित्रांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर दुसºया दिवशी गिट्टीखदान ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.ठाणेदार विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक साजिद अहमद, हवालदार मजहर खान, नायक सूरज धोटे, राजेश दुबे, रोशन नांदेकर, धर्मेंद्र मिश्रा यांनी ज्या ठिकाणी घटना घडली, त्या ठिकाणच्या आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरातून आरोपींच्या पल्सरचा क्रमांक तसेच मडावी यांचा मोबाईलला सुरू केल्यानंतरचा सीडीआर मिळवून आरोपींचा छडा लावला. १४ नोव्हेंबरला आरोपी सोमकुंवरला त्याच्या घरी जाऊन पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने या गुन्ह्याची कबुली दिली. गुन्ह्यात सहभागी असलेल्या साथीदाराचे नाव आणि पत्ताही सांगितला. पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले.विविध भागात गुन्हेआरोपी सोमकुंवर आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराने अशा प्रकारे गुन्हे करून शहरात धूम मचवली होती. ते झटक्यात मोबाईल हिसकावून घ्यायचे आणि क्षणात नजरेआड व्हायचे. त्यांनी गिट्टीखदानमधील गुन्ह्यासोबत अशाच प्रकारे नंदनवनमध्ये दोन, धंतोली, सीताबर्डी, अंबाझरी आणि सक्करदरातही गुन्हे केले होते. त्यांनी त्यातील सहा गुन्ह्यांची कबुली दिली आहे. पोलिसांनी या दोघांकडून १७ मोबाईल तसेच गुन्ह्यात वापरलेली बजाज पल्सर असा एकूण एकूण ३ लाख २६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

टॅग्स :RobberyदरोडाArrestअटक