नागपुरात आमदार प्रवीण दटके यांची अधिकाऱ्यांना शिवीगाळ; लेखणी बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 13:53 IST2020-07-13T13:52:46+5:302020-07-13T13:53:24+5:30
आमदार प्रवीण दटके यांनी सोमवारी सकाळी फोन वरून बोलताना नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक प्रमोद गावंडे यांना वार्डातील कामासंदर्भात विचारणा करून जाब विचारला. अपशब्द वापरले.

नागपुरात आमदार प्रवीण दटके यांची अधिकाऱ्यांना शिवीगाळ; लेखणी बंद आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: आमदार प्रवीण दटके यांनी सोमवारी सकाळी फोन वरून बोलताना नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक प्रमोद गावंडे यांना वार्डातील कामासंदर्भात विचारणा करून जाब विचारला. अपशब्द वापरले. शिवीगाळ केल्या संदर्भात गावंडे यांनी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कडे तक्रर केली.
या घटनेच्या निषेधार्थ कर्मचारी संघटनेने मनपा मुख्यालयात सभा घेऊन लेखणी बंद आंदोलन पुकारले. प्रवीण दटके यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला. कर्मचारी व अधिकारी कोरोना नियंत्रणासाठी लढत असताना पदाधिकाऱ्यांनी त्यांचे मनोबल खच्ची करू नये, असे आवाहन मनपा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र टिंगने यांनी केले आहे.