नागपूर एमआयडीसी भागात कचरा वेचणाऱ्याला भरधाव ट्रेलरने चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 12:23 AM2017-11-18T00:23:06+5:302017-11-18T00:25:21+5:30

In the Nagpur MIDC area, the garbage collector was hit by a trailer | नागपूर एमआयडीसी भागात कचरा वेचणाऱ्याला भरधाव ट्रेलरने चिरडले

नागपूर एमआयडीसी भागात कचरा वेचणाऱ्याला भरधाव ट्रेलरने चिरडले

Next
ठळक मुद्देमृताची ओळख पटली नाहीट्रेलरचालकाला अटक

आॅनलाईन लोकमत
नागपूर : हलगर्जीपणे ट्रेलर चालवून चालकाने एका कचरा वेचणाºयाला चिरडले. गुरुवारी रात्री ८.३० वाजता एमआयडीसीतील रंगोली बारजवळ हा भीषण अपघात घडला.
एमआयडीसीच्या औद्योगिक परिसरात कचरा वेचून आपल्या पोटाची खळगी भरणारा एक अनोळखी इसम रंगोली बारजवळ गुरुवारी रात्री उभा होता. आरोपी ट्रेलर (एमएच ३६/ १७५५) चा चालक अनिल राम गरिबाकुमार (वय २१, रा. मौआईमा, पुरी, अलाहाबाद) याने हलगर्जीपणे ट्रेलर वळवून त्या व्यक्तीला चिरडले. त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे परिसरातील वातावरण काही वेळेसाठी संतप्त झाले. महेश फुलचंद जयस्वाल (वय ५०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी अनिलला अटक केली.

Web Title: In the Nagpur MIDC area, the garbage collector was hit by a trailer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात