२०२० मध्ये नागपूर मेट्रो प्रकल्प येणार पूर्णत्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 10:45 AM2020-01-01T10:45:39+5:302020-01-01T10:46:55+5:30

मेट्रो रेल्वेमुळे शहराच्या विकासाला गती येईल. औद्योगिक गुंतवणूक वाढून रोजगारही वाढेल. नागपूर हे जागतिक दर्जाचे शहर होईल.

Nagpur Metro project to be completed in 2020 | २०२० मध्ये नागपूर मेट्रो प्रकल्प येणार पूर्णत्वास

२०२० मध्ये नागपूर मेट्रो प्रकल्प येणार पूर्णत्वास

googlenewsNext
ठळक मुद्देविकासाला येणार वेग विस्तारीकरणाने प्रवाशांना मिळणार दिलासा

मोरेश्वर मानापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आपले नागपूर बदलत आहे... ४१ किमीचा मेट्रो प्रकल्प, सिमेंटचे रस्ते, मोठमोठाले उड्डाणपूल, रोजगार आणि पर्यटनाला चालना देणारे प्रकल्प शहरात साकारले जात आहेत. मेट्रोच्या विस्तारीकरणाने त्यात आणखी भर पडणार आहे.
मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन आॅगस्ट २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण ४१ कि़मी. लांबीचा आणि ८,६८० कोटी रुपयांचा हा प्रकल्प पूर्वी डिसेंबर २०१९ मध्ये आता डिसेंबर २०२० मध्ये पूर्ण होणार आहे. सध्या ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पात केंद्र सरकारचा २० टक्के १,७३६ कोटी, राज्य सरकारचा २० टक्के १,७३६ कोटी, मनपा व नासुप्रचा ५ टक्के अर्थात प्रत्येकी ४३४ कोटी आणि कर्ज वा इतर स्रोतांद्वारे ५० टक्के असा ८,६८० कोटींचा निधी उभारण्यात आला आहे.
नागपूरची वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक वाहतुकीच्या आवश्यकतेचा विचार करून शहरातील मेट्रो वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करणाऱ्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसºया टप्यातील ४८.२९ किमीच्या मार्गाला मान्यता मिळाली आहे. विस्तारित प्रकल्पासाठी १०,८६० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. सध्याचा ४१ किमी आणि विस्तारित ४८ किमी अशा ८९ किमीवर मेट्रो रेल्वे धावण्याचे नियोजन झाले आहे. हा प्रकल्प अतिमहत्त्वाचा नागरी प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला आहे.
विकासाला येणार गती
नागपूर शहरात सध्या १२ लाख वाहने रस्त्यावर धावतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. आजची स्थिती आणि भविष्याचा विचार करता मेट्रो रेल्वेची गरज निर्माण झाली आहे. इतर वाहनांच्या तुलनेत स्वस्त, सर्वाधिक प्रवासी वाहून नेणारी तसेच कमी वेळेत अंतर कापणारी मेट्रो रेल्वे नागरिकांना वाहतुकीच्या दृष्टीने सोयीचीच ठरणार आहे. मेट्रो रेल्वेमुळे शहराच्या विकासाला गती येईल. औद्योगिक गुंतवणूक वाढून रोजगारही वाढेल. नागपूर हे जागतिक दर्जाचे शहर होईल.
 

Web Title: Nagpur Metro project to be completed in 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Metroमेट्रो