शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

नागपूर मेडिकलमध्ये २००वर महिलांची कर्करोग तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 11:07 PM

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) २००वर महिलांची मोफत कर्करोग तपासणी केली, सोबतच या रोगासंदर्भात विविध माहिती देऊन जनजागृती केली.

ठळक मुद्देजागतिक महिला दिन साजरा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) २००वर महिलांची मोफत कर्करोग तपासणी केली, सोबतच या रोगासंदर्भात विविध माहिती देऊन जनजागृती केली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे उपस्थित होते.वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेनुसार या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला डॉ. वृंदा सहस्त्रभोजने, डॉ. योगेंद्र बन्साडे, डॉ. राज गजभिये, डॉ. कृष्णा कांबळे, डॉ. उदय नारलवार, डॉ. फिदवी, डॉ. अविनाश गावंडे, डॉ. फुलपाटील, डॉ. राजेश गोसावाी, डॉ. अशोक दिवाण, मुख्य प्रशासकीय अधिकारी परशुराम दोरवे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमांतर्गत सहभागी झालेल्या महिलांची मॅमोग्राफी, पॅपस्मेअर, बोन डेन्सिटी सारख्या तपासण्या मोफत करण्यात आल्या. संचालन डॉ. प्रगती राठेड यांनी तर आभार डॉ. अविनाश गावंडे यांनी मानले. यावेळी कर्करोग तज्ज्ञ डॉ. कृष्णा कांबळे व डॉ. अशोक दिवाण यांनी महिलांच्या कर्करोगावर मार्गदर्शन केले.ब्रेस्ट कॅन्सरमध्ये अद्यावत शस्त्रक्रियेची भर -डॉ. निसवाडेडॉ. अभिमन्यू निसवाडे म्हणाले, पूर्वी कॅन्सरच्या प्राथमिक अवस्थेत निदान झाल्यावर तो बरा होण्याचे प्रमाण केवळ २० टक्के होते. पण आता ते तब्बल ८० टक्क्यांपर्यंत वाढले आहे. रुग्णामध्ये गाठ असलेले पूर्ण स्तन काढण्याची शस्त्रक्रिया केली जायची परंतु आता मेडिकलमध्ये अद्यावत शस्त्रक्रियेद्वारे स्तनातील गाठ काढण्याचा पर्याय अवलंबला जाणार आहे. मेडिकलच्या कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या बांधकामाला लवकरच सुरुवात होईल, असेही ते म्हणाले.तीन महिलांना मुख कर्करोग : शासकीय दंत रुग्णालयजागतिक महिला दिनाच्यानिमित्ताने शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने ११२ महिलांची मुख कर्करोगाची नि:शुल्क तपासणी करण्यात आली. यात तीन महिलांना मुख कर्करोग असल्याचे निदान झाले, तर १२ महिलांना मुख पूर्वकर्करोग असल्याचे आढळून आले. ही तपासणी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. सिंधू गणवीर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.रुग्णालयाच्या सामाजिक दंतशास्त्र विभागाच्यवतीने आयोजित महिला दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. शैलेजा देशपांडे, अर्चना दास उपस्थित होत्या. यावेळी मुख कर्करोगावर डॉ. देशपांडे, डॉ. सिंधू गणवीर व दास यांनी मार्गदर्शन केले. डॉ. गणवीर यांनी ११२ रुग्णांमधून तिघांना कर्करोग व १२ मुख पूर्वकर्करोगाचे रुग्ण आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त केले. या रोगाबाबत घराघरातून जनजागृती होणे आवश्यक असल्याचेही त्या म्हणाल्या. उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आभा चव्हाण, ज्योती पंडागळे, सीमा सांडे या महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विविध स्पर्धा व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. रडके, डॉ. कळमकर, डॉ. शुभा व डॉ. ज्योती वानखेडे यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Women's Day 2018महिला दिन २०१८Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय