नागपूर होतेय मेडिकल हब
By Admin | Updated: February 2, 2015 01:09 IST2015-02-02T01:09:27+5:302015-02-02T01:09:27+5:30
नागपूर हे मेडिकल हब होत आहे. अनेक मोठमोठी रुग्णालये नागपुरात येत आहेत. यात केवळ डॉक्टर, नर्स किंवा टेक्निशियन्स यांना संधी मिळणार आहेच, परंतु रुग्णालयांना विविध

नागपूर होतेय मेडिकल हब
नागपूर : नागपूर हे मेडिकल हब होत आहे. अनेक मोठमोठी रुग्णालये नागपुरात येत आहेत. यात केवळ डॉक्टर, नर्स किंवा टेक्निशियन्स यांना संधी मिळणार आहेच, परंतु रुग्णालयांना विविध वस्तूंची दररोज आवश्यकता भासत असते. कॉटन बॅण्डेजपासून तर सिरिंजपर्यंतच्या वस्तू लागतात. या वस्तू तयार करणे किंवा उपलब्ध करून देणाऱ्यांनासुद्धा संधी चालून येणार आहेत, तेव्हा यादृष्टीने विचार करावा, असे आवाहन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी केले.
वैद्यकीय क्षेत्राद्वारेही विकासाच्या संधी या विषयावर ते बोलत होते. डॉ. श्रीगिरीवार म्हणाले, प्रत्येक रुग्णालयात कॉटन बॅण्डेज, इंजेक्शन सिरिंज, सलाईन बॉटल, डस्टबीन,आॅपेरशनसाठी आवश्यक असलेली छोटी छोटी यंत्रे आदींची गरज आहे. तेव्हा या वस्तू रुग्णालयांना उपलब्ध करून त्यातून रोजगार निर्माण करण्याचा विचार करता येऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. सतीश व्यवहारे यांनी फार्मसी उद्योगामध्ये विदर्भातील तरुणांना मोठी संधी असल्याचे सांगितले. आ. पंकज भोयर यांनी अध्यक्षपदावरून सांगितले की, नवीन सरकार आले असल्याने विदर्भातील लोकांना चांगल्या संधी निर्माण झाल्या आहेत. परंतु या संधी प्राप्त करायच्या असतील तर आपल्यात आत्मविश्वास निर्माण करावा, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)
नागपूर होत आहे मेडिकल हब
रुग्णालयांना मोठ्या प्रमाणावर लागणार मनुष्यबळ
कॉटन बॅण्डेज, चादर, रुग्णांचे कपडे, आॅपरेशनसाठी लागणारे साहित्य आदींसह अनेक वस्तूंची गरज
या वस्तू उपलब्ध करून देण्यातून रोजागाराच्या संधी
नागपुरात मोठ्या प्रमाणावर फार्मसी कॉलेज असल्याने फार्मसी क्षेत्रात मोठी संधी