शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

नागपूर मेडिकल कॉलेज इस्पितळात काळी रिबीन बांधून रुग्णसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 01:20 IST

गेल्या तीन महिन्यांपासून विद्यावेतनाच्या प्रतीक्षेत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) निवासी डॉक्टरांनी याविरोधात सोमवारी काळ्या रिबीन बांधून रुग्णसेवा दिली. विशेष म्हणजे, शस्त्रक्रियागृहातही निवासी डॉक्टरांनी हे आंदोलन कायम ठेवले. सायंकाळी एकत्रित झालेल्या निवासी डॉक्टरांसमोर मेडिकल मार्डचे अध्यक्ष डॉ. आशुतोष जाधव यांनी पुढील आंदोलनाची रूपरेषा मांडली.

ठळक मुद्देविद्यावेतन रखडल्याने निवासी डॉक्टरांचे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या तीन महिन्यांपासून विद्यावेतनाच्या प्रतीक्षेत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) निवासी डॉक्टरांनी याविरोधात सोमवारी काळ्या रिबीन बांधून रुग्णसेवा दिली. विशेष म्हणजे, शस्त्रक्रियागृहातही निवासी डॉक्टरांनी हे आंदोलन कायम ठेवले. सायंकाळी एकत्रित झालेल्या निवासी डॉक्टरांसमोर मेडिकल मार्डचे अध्यक्ष डॉ. आशुतोष जाधव यांनी पुढील आंदोलनाची रूपरेषा मांडली.मेडिकलमध्ये ६०० निवासी डॉक्टर तर १५० वरिष्ठ निवासी डॉक्टर कार्यरत आहेत. निवासी डॉक्टरांना दरमहा ५४ हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. महिन्याकाठी दोन कोटी ४० लाख रुपये यावर खर्च होतो. वैद्यकीय शिक्षण विभागाकडून हा निधी उपलब्ध होतो. परंतु आॅक्टोबर महिन्यापासून हा निधीच मिळाला नाही. याविरोधात निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ने सोमवारपासून आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आज सर्व निवासी डॉक्टरांनी दंडाला काळ्या रिबीन बांधून रुग्णसेवा दिली. ज्या निवासी डॉक्टरांची शस्त्रक्रियागृहात ड्युटी होती त्यांनीही काळ्या रिबीन बांधल्या होत्या. सायंकाळी निवासी डॉक्टरांची बैठक घेऊन मार्ड अध्यक्ष डॉ. जाधव यांनी पुढील आंदोलनाची रूपरेषा मांडली. यात गुरुवारी रॅली काढून शासनाचे लक्ष वेधले जाणार आहे. या आठवड्यात विद्यावेतनाचा प्रश्न न सुटल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही मार्डने दिला आहे.स्थानिकस्तरावरून देण्यात येणाऱ्या विद्यावेतनावर आक्षेपप्राप्त माहितीनुसार, वैद्यकीय शिक्षण विभागाकडून विद्यावेतनाचा निधी उपलब्ध न झाल्याने गेल्या महिन्यात अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी जिल्हाधिकाºयांच्या परवानगीने स्थानिकस्तरावरून विद्यावेतनाची समस्या सोडविली होती. परंतु या महिन्यात कोषागार विभागाने स्थानिकस्तरावरून विद्यावेतन देता येत नसल्याचा नियम समोर केल्याने अडचणी वाढल्या आहेत. सध्या विद्यावेतनाची फाईल वित्त विभागात पडून असल्याची माहिती आहे.निवासी डॉक्टरांचा हा छळनिवासी डॉक्टर २४ तास रुग्णसेवेत असतात. यामुळे त्याला वेळेत विद्यावेतन मिळावे, ही शासनाची जबाबदारी आहे. परंतु याकडे नेहमीच दुर्लक्ष झाले आहे. विद्यावेतनाबाबत यापूर्वीही संप व आंदोलने झाली, मात्र आजही निवासी डॉक्टरांचा छळ थांबलेला नाही. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन तीव्र केले जाईल.डॉ. आशुतोष जाधवअध्यक्ष, मेडिकल मार्ड

टॅग्स :doctorडॉक्टरagitationआंदोलन