नागपुरात प्रतिबंधित क्षेत्राबाहेर मोलकरणींना मुभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 11:12 PM2020-05-18T23:12:13+5:302020-05-18T23:17:13+5:30

कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊन दरम्यान सुरक्षेचा उपाय म्हणून महापालिकेतर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. शासन निर्देशांनुसार काही निर्बंधामध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता देण्यात येत आहे. आता प्रतिबंधित क्षेत्राबाहेर मोलकरणीसह घरकामगारांना काम करण्यास महापालिकेतर्फे सूट देण्यात आली आहे.

In Nagpur, maids are allowed outside the restricted area | नागपुरात प्रतिबंधित क्षेत्राबाहेर मोलकरणींना मुभा

नागपुरात प्रतिबंधित क्षेत्राबाहेर मोलकरणींना मुभा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊन दरम्यान सुरक्षेचा उपाय म्हणून महापालिकेतर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. शासन निर्देशांनुसार काही निर्बंधामध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता देण्यात येत आहे. आता प्रतिबंधित क्षेत्राबाहेर मोलकरणीसह घरकामगारांना काम करण्यास महापालिकेतर्फे सूट देण्यात आली आहे. मात्र, शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातील कुठलीही व्यक्ती प्रतिबंधित क्षेत्राबाहेर घरकामास जाणार नाही. तसेच प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील कुठलीही व्यक्ती प्रतिबंधित क्षेत्रात घरकामास जाऊ शकणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय घरकामगारांना कामावर बोलावणे अथवा न बोलावणे हा निर्णय पूर्णपणे संबंधित घरप्रमुख किंवा सोसायट्यांंवर सोपिवण्यात आला आहे. मात्र, याबातचा निर्णय घेताना दोघांनाही सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे.
लॉकडाऊनचा पहिला टप्पा सुरू झाल्यापासून शासनाच्या दिशानिर्देशाचे पालन करत बहुतांश सोसायटी आणि घराघरांमध्ये घरकामासाठी येणाऱ्या महिला आणि पुरुषांनाही सुरक्षेचा उपाय म्हणून नागरिकांनी तसेच सोसायट्यांनी स्वत:हून रजा दिली होती. दरम्यान लॉकडाऊनचा चौथा टप्पा ३१ मे पर्यंत राज्य शासनाने वाढविला असला तरी स्थानिक प्रशासनाने काही बाबींसाठी शिथिलता आणली आहे. यामुळे दैनंदिन कामकाज हळुहळू पूर्वपदावर येण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.
दरम्यान, घरकाम करणारयाबाबत बऱ्याच नागरिकांमध्ये अद्यापही संभ्रमाचे वातावरण आहे. अनेक सोसायट्यांनी स्वत:हून घरकामगारांबाबत टाकलेले निर्बंध हटविले नाही. यासंदर्भात स्पष्टता आणताना मनपा आयुक्तांनी घरकामासाठी किंवा रुग्ण, वृद्ध यांचेसाठी केअरटेकर ठेवण्याबाबत मनपा प्रशासनाने निर्बंध लावण्याबाबत कोणतेही आदेश काढलेले नाही,असे स्पष्ट केले.

घरकामगारांनी घ्यावी काळजी
खबरदारीचा उपाय म्हणून घरकामगारांनी कामावर येताना हात स्वच्छ धुणे, सॅनिटाईज करणे, मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे या गोष्टी पाळणे गरजेचे आहे.

वृद्ध रुग्णांच्या केअरटेकर प्रतिबंधित क्षेत्राबाहेर निर्बंध नाही
वृद्ध आणि रुग्णांच्या सुविधेच्या दृष्टीने त्यांच्या केअरटेकरसाठी प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्य ठिकाणी सेवा देण्यास कुठलेही निर्बंध नसल्याची माहिती देताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोमवारी दिली. मोठ्या सोसायट्यांमध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक व आजारी व्यक्ती राहतात. त्यांना जीवन जगणे सुकर व्हावे व दैनंदिन जीवनात अडचण निर्माण होउ नये यासाठीही सोसायट्यांनी घरकाम करणा-या व्यक्तींना खबरदारीचे सर्व नियम पाळून सोसायटीमध्ये प्रवेश देण्यास हरकत नाही, असेही मुंढे यांनी सांगितले.

Web Title: In Nagpur, maids are allowed outside the restricted area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.