नागपूर महामेट्रो ; रंगरंगोटीचे कार्य अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 11:34 AM2019-02-28T11:34:09+5:302019-02-28T11:34:43+5:30

लवकरच महामेट्रो नागपूर प्रकल्पाच्या प्रवासी सेवेला सुरुवात होणार असल्याने संत्रानगरी नागपूर आता खऱ्या अर्थाने मेट्रो सिटी म्हणून ओळखली जाणार आहे.

Nagpur Mahamatro; The last stage of the color work | नागपूर महामेट्रो ; रंगरंगोटीचे कार्य अंतिम टप्प्यात

नागपूर महामेट्रो ; रंगरंगोटीचे कार्य अंतिम टप्प्यात

googlenewsNext
ठळक मुद्देप्रदूषणरहित रंगामुळे अतिरिक्त खर्चाची बचत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लवकरच महामेट्रो नागपूर प्रकल्पाच्या प्रवासी सेवेला सुरुवात होणार असल्याने संत्रानगरी नागपूर आता खऱ्या अर्थाने मेट्रो सिटी म्हणून ओळखली जाणार आहे. प्रवासी सेवेसाठी प्रकल्पाचे अंतिम टप्यातील कार्य वेगाने पूर्ण होत आहे. नागपूरकरांच्या खास पसंतीचे रंग मेट्रो मार्गिकांना देण्यात येत असून रंगरंगोटीचे कार्य त्वरतेने पूर्ण करण्यात येत आहे.
आॅरेंज रंगाने उत्तर-दक्षिण मार्ग तर अ‍ॅक्वा रंगाने पूर्व-पश्चिम मार्ग ओळखला जाणार आहे. पहिल्या टप्य्यात वर्धा आणि हिंगणा मार्गावर मेट्रोची प्रवासी सेवा सुरू होणार असल्याने याठिकाणी मार्गाला आॅरेंज आणि अ‍ॅक्वा रंग देण्यात येत आहे. रंगरंगोटीचे कार्य नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी मेट्रोचे कर्मचारी दिवसरात्र कार्यरत आहे. दोन्ही मार्गिकांवर वाहनांची सतत गर्दी असतानाही सुरक्षेचे सर्व नियमांचे पालन करत कर्मचारी कार्य करीत आहेत. पिलरच्या अगदी खालच्या भागापासून वरच्या टोकापर्यंत आणि व्हायाडक्टला रंग देण्यात येत आहे. यासाठी मॅनलिफ्टर मशीनच्या साहाय्याने रंग कार्य सुरू आहे.
रंगाची खास वैशिष्ट्ये म्हणजे रंग पूर्णपणे मेन्टेनन्स फ्री असून वर्षांनुवर्षे चालणारे आहेत. एकदा रंग लावण्यानंतर कोणताही अतिरिक्त खर्च यासाठी करावा लागत नाही. या रंगावर हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळ्यात कोणतेही परिणाम होत नसून किमान आणि कमाल तापमान सहन करण्याची क्षमता या रंगात आहे. यामुळे प्रदूषणाचा मुख्यत: कार्बन डायआॅक्साईडचा कोणताही प्रभाव यावर पडत नाही. रंग लावण्यापूर्वी संपूर्ण जागा समतल करण्यात येते आणि त्यानंतर तीन टप्प्यात रंग लावण्यात येत आहे. दोन पिलरच्या मध्य भागातील डिव्हायडरमध्ये रंगीबेरंगी रोपे लावण्यात येत आहेत. बोगनविला थेमा अशी शोभिवंत झाडे असून ती सर्व प्रकारच्या वातावरणानुकूल आहेत. प्रत्येक ५०० मीटर अंतरावर वेगवेगळ्या रंगाची रोपटी लावण्यात येत आहेत.

Web Title: Nagpur Mahamatro; The last stage of the color work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Metroमेट्रो