शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात मनोरुणाने घेतला पोलिसांच्या ‘पेट्रोलिंग व्हॅन’चा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 00:08 IST

गुन्हेगारांच्या शोधार्थ फिरणाऱ्या पोलिसांच्या ‘पेट्रोलिंग व्हॅन’चा ताबा घेऊन एका मनोरुग्ण तरुणाने सोमवारी सायंकाळी पोलिसांची चांगलीच भंबेरी उडवली. धावपळ करून पोलिसांनी व्हॅनच्या ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या मनोरुग्णाला व्हॅनच्या खाली उतरविले. त्याची कानशेकणी केली आणि त्याला हुसकावून लावले. मेडिकल चौकात सोमवारी सायंकाळी ६ च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली होती.

ठळक मुद्देपोलिसांची उडाली भंबेरी : मेडिकल चौकात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हेगारांच्या शोधार्थ फिरणाऱ्या पोलिसांच्या ‘पेट्रोलिंग व्हॅन’चा ताबा घेऊन एका मनोरुग्ण तरुणाने सोमवारी सायंकाळी पोलिसांची चांगलीच भंबेरी उडवली. धावपळ करून पोलिसांनी व्हॅनच्या ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या मनोरुग्णाला व्हॅनच्या खाली उतरविले. त्याची कानशेकणी केली आणि त्याला हुसकावून लावले. मेडिकल चौकात सोमवारी सायंकाळी ६ च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली होती.गुन्हेगारांच्या शोधार्थ पोलिसांच्या पेट्रोलिंग व्हॅन (गस्ती पथके) शहरातील विविध भागात फिरतात. अशाच प्रकारे अजनीचे एक पोलीस पथक गस्त करीत सोमवारी सायंकाळी मेडिकल चौकात पोहचले. व्हॅन रस्त्याच्या बाजूला उभी करून पोलीस बाजूच्या गर्दीच्या ठिकाणी कोणता गुन्हेगार आहे काय, त्याची चाचपणी करू लागले. घाईगडबडीत उतरताना व्हॅन चालकाने चावी स्टेअरिंगलाच लावून ठेवली. अचानक व्हॅनच्या सायलेन्सरमधून जोरात धूर निघू लागला. आवाज ऐकून व्हॅन दुसºयाच कुणीतरी सुरू केल्याचे लक्षात येताच हादरलेल्या पोलिसांनी व्हॅनच्या ड्रायव्हिंग सीटकडे धाव घेतली. तेथे पोलिसांना एक तरुण स्टेअरिंगचा ताबा घेऊन बसलेला दिसला. पोलिसांनी त्याला अक्षरश: खेचूनच बाहेर काढले. त्यानंतर त्याची चांगली कानशेकणी केली. वर्दळीचे ठिकाण असल्यामुळे अल्पावधीतच तेथे मोठी गर्दी जमली. पोलीस त्याच्यावर कारवाईच्या मानसिकतेत होते. मात्र, गर्दीतील काही जणांनी तो तरुण मनोरुग्ण असून, दिवसभर मेडिकल चौकात वेडसरासारखे चाळे करीत फिरतो, असे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी त्याला कारवाई न करता सोडून दिले.मोठा अनर्थ टळलामनोरुग्णाने पोलीस व्हॅन सुरू केली. एक्सीलेटरही दाबले. मात्र, सुदैवाने त्याने गिअर बदलवला नाही. अन्यथा व्हॅन मागे किंवा पुढे झाली असती तर वर्दळीच्या मेडिकल चौकात भयावह दुर्घटना घडली असती. प्रत्यक्षदर्शी सूत्रांनुसार, त्या मनोरुग्ण तरुणाने व्हॅनचा ताबा घेण्यापूर्वी चौकात उभी असलेल्या एका कारची नंबरप्लेट काढून घेतली होती.

टॅग्स :Policeपोलिसnagpurनागपूर