शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
4
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
5
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
6
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
7
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
8
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
9
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
10
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
11
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
12
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
13
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
14
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
15
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
16
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
17
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास
18
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
19
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
20
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे

नागपुरातील बंपर व्होटिंगने धडधड वाढली; दोन विधानसभेच्या क्षेत्रात दोन लाखांवर मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2024 10:04 IST

पश्चिम व मध्य मतदारसंघांमध्ये मात्र लक्षणीय घट 

कमलेश वानखेडेनागपूर : नागपूर मतदारसंघात २२ लाख २३ हजार २८१ मतदारांपैकी ५४.११ टक्के म्हणजेच १२ लाख २ हजार ९६२ मतदारांनी मतदान केले. यात पोस्टल मतदानाची आकडेवारी समाविष्ट नाही. उत्तर नागपूर व पूर्व नागपूर या दोन विधानसभा मतदारसंघांत दोन लाखांवर मतदान झाले आहे. उत्तर नागपुरात काँग्रेसने ‘हात’ मारल्याची, तर  पूर्व नागपुरात भाजपचे ‘कमळ’ फुलल्याची चर्चा आहे. या दोन्ही मतदारसंघांत झालेल्या ‘बंपर व्होटिंग’ काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांची धाकधूक वाढली आहे. 

 टक्केवारीचा विचार केला तर पूर्व नागपुरात सर्वाधिक ५५.७६ टक्के मतदान झाले. त्यापाठोपाठ उत्तर नागपूर ५५.१६ टक्क्यांवर राहिले. मात्र, प्रत्यक्ष मतदारसंख्येचा विचार करता उत्तर नागपूरने बाजी मारली आहे. मतदार संख्येनुसार उत्तर नागपुरात सर्वाधिक २,२३,६२० मतदारांनी मतदान केले. त्यापाठोपाठ पूर्व नागपुरात २,१६,२१६, दक्षिण-पश्चिम नागपुरात १,९९,९१६, दक्षिण नागपुरात १,९६,६६६, पश्चिम नागपुरात १,९६,२१५ व मध्य नागपुरात १,७०,६३१ मतदारांनी मतदान केले आहे.

मध्य नागपुरातही ६ हजारांची कपात२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मध्य नागपुरात १ लाख ७६ हजार ११५ मतदान झाले होते. यावेळी १ लाख ७० हजार ६३१ मतदारांनी मतदान केले. सुमरे ६ हजार मतदान कमी झाले. दक्षिण-पश्चिम मतदारसंघात २ लाख १ हजार १७९ मतदान झाले होते. यावेळी त्यात काहीअंशी कपात होऊन १ लाख ९९ हजार ९१६ मतदान झाले. द. नागपुरात गेल्यावेळी १ लाख ९९ हजार ५९६ मतदान झाले होते. यावेळी १ लाख ९६ हजार ६६६ मतदान झाले. 

ठाकरेंच्या पश्चिममध्ये साडेनऊ हजारांची घट२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम नागपुरात गेल्यावेळी २ लाख ५ हजार ८५६ मतदान झाले होते. यावेळी १ लाख ९६ हजार २१५ मतदान झाले. गेल्यावेळच्या तुलनेत पश्चिम नागपुरात ९ हजार ६४१ मतदान कमी झाले आहे. पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे हे यावेळी काँग्रेसकडून लोकसभेच्या रिंगणात होते. मात्र, त्यानंतरही त्यांना स्वत:च्या मतदारसंघात मतदान वाढविता आलेले नाही. पश्चिम नागपूरमधून त्यांना तुटीचा फटका बसू शकतो. 

पूर्वमध्ये ८ हजार, तर उत्तरमध्ये १८ हजारांची वाढगेल्या लोकसभा निवडणुकीत पूर्व नागपुरात २ लाख ८ हजार ३७८ मतदान झाले होते. नितीन गडकरी यांना येथे ७५ हजार ३८० मतांची आघाडी मिळाली होती.  तर उत्तर नागपुरात २ लाख ५ हजार ८५६ मतदान झाले होते. या मतदारसंघात काँग्रेसचे नाना पटोले यांनी ८ हजार ९१० मतांची आघाडी मिळाली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीशी तुलना केली असता पूर्व नागपुरात प्रत्यक्षात सुमारे ८ हजार मतदान वाढले आहे. तर उत्तर नागपुरात सुमारे १८ हजार मतदान वाढले आहे.

टॅग्स :nagpur-pcनागपूरNitin Gadkariनितीन गडकरीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपाbig Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४