आजपासून नागपूर आठवडाभर लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:07 IST2021-03-15T04:07:53+5:302021-03-15T04:07:53+5:30

रविवारीही बंदचा परिणाम रविवारी सार्वजनिक सुटी असते. त्यामुळे आज बंदचा परिणाम दिसून आला. अत्यावश्यक सेवा वगळून बाजार, दुकाने पूर्णपणे ...

Nagpur locked for a week from today | आजपासून नागपूर आठवडाभर लॉक

आजपासून नागपूर आठवडाभर लॉक

रविवारीही बंदचा परिणाम

रविवारी सार्वजनिक सुटी असते. त्यामुळे आज बंदचा परिणाम दिसून आला. अत्यावश्यक सेवा वगळून बाजार, दुकाने पूर्णपणे बंद होती. शनिवारी मात्र लॉकडाऊनच्या भीतीमुळे वर्दळ जास्त दिसून आली.

बॉक्स

या ठिकाणी राहणार लॉकडाऊन

प्रशासनाने लॉकडाऊन पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात लागू केला आहे. यात महानगरपालिका सीमेमध्ये येणारी सर्व पोलीस ठाणी, या शिवाय कामठी, हिंगणा, सोनेगाव, कोराडी, कळमना, हुडकेश्वर आदी पोलीस ठाण्यांच्या क्षेत्रांचाही समावेश आहे.

बॉक्स

दारू दुकाने बंद, घरपोच सेवा सुरू

लॉकडाऊनदरम्यान दारूची दुकाने व बार बंद राहतील. परंतु घरपोच सेवा सुरू राहील.

बॉक्स

खासगी कार्यालयांमध्ये लेखाविषयक कामांना परवानगी

सध्या मार्च महिना सुरू आहे. अनेकांना मार्च एंडिंगची कामे करायची आहेत. त्यामुळे लॉकडाऊनदरम्यान खासगी कार्यालये व आस्थापनांच्या कर्मचाऱ्यांना व कामदारांना वेतन व लेखाविषयक कामांची मंजुरी देण्यात आली आहे. परंतु संबंधित आस्थापना व कार्यालयांची कंपनी कायद्यानुसार नोंदणी झालेली असावी. जास्तीत जास्त १० लोकांना ही परवानगी राहील. इतर दुसऱ्या कामांसाठी कार्यालय सुरू राहणार नाही.

बॉक्स

एकाच प्रकारची दुकाने रांगेने असल्यास परवानगी नाही

किराणा, भाजी, फळ, मांस, चिकन आदींची दुकाने एकाच रांगेने असल्यास अशा दुकानांना परवानगी देण्यात आलेली नाही. संबंधित दुकाने ही एकटी असायला हवी. तेव्हाच त्याला परवानगी राहील. मनपा आयुक्त राधाकृष्ण बी. यांनी ही बाब स्पष्ट केली.

Web Title: Nagpur locked for a week from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.