आजपासून आठवडाभर नागपूर `लॉक‘

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:07 IST2021-03-15T04:07:28+5:302021-03-15T04:07:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाचा वाढत चाललेला संसर्ग पाहून नागपुरात कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

Nagpur `Lock 'for a week from today | आजपासून आठवडाभर नागपूर `लॉक‘

आजपासून आठवडाभर नागपूर `लॉक‘

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाचा वाढत चाललेला संसर्ग पाहून नागपुरात कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १५ मार्च ते २१ मार्चदरम्यान नागपूर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात कडक लॉकडाऊन लागू असेल. यादरम्यान पूर्णत: संचारबंदी लागू राहील. कुणालाही विनाकारण बाहेर फिरता येणार नाही. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहील. यासाठी जिल्हा व मनपा प्रशासनासह पोलीस विभागही सज्ज झाला आहे. लॉकडाऊनचे उल्लंघन करणारे आणि मास्क न घालता फिरताना आढळून आल्यास त्यांच्यावर पोलीस कडक कारवाई करतील. हा लॉकडाऊन पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत राहणार आहे. यात महापालिकेच्या सीमेसह शहरातील सर्व पोलीस स्टेशन परिसरासह कामठी, जुने व नवीन हिंगणा, सोनेगाव, कोराडी, कळमना, हुडकेश्वर आदी पोलीस स्टेशन परिसरातही लागू राहील.

....

हे राहणार बंद

- शहरातील शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, शिकवणी वर्ग, प्रशिक्षण संस्था

- शहर सीमेतील कोणत्याही धार्मिक व राजकीय सभा, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम

- शहरातील सभागृह, मंगल कार्यालये, लॉन या ठिकाणी होणारे लग्नसमारंभ.

- धार्मिक स्थळे नागरिकांना दर्शनासाठी बंद राहतील. मात्र नियमित पूजाअर्चा ५ लोकांच्या उपस्थितीत करता येईल.

- शहरातील सर्व आठवडी बाजार

- रेस्टॉरंट, हॉटेल, खाद्यगृह बंद राहतील. (होम डिलिव्हरी सुरू राहील)

-जलतरण तलाव

- क्रीडा स्पर्धांचे आयोजन

- सर्व खासगी आस्थापना (आर्थिक लेखाविषयक सेवा वगळून)

- मॉल्स, चित्रपटगृह, नाट्यगृह

- दुकाने, मार्केट

- शहरातील उद्याने नागरिकांसाठी बंद

- व्यायामशाळा, जिम

- दारू दुकाने बंद, घरपोच सेवा सुरू

......

हे सुरू राहणार

- वैद्यकीय सेवा, मेडिकल स्टोअर्स

- वृत्तपत्र, मीडिया संदर्भातील सेवा

- दूधविक्री व पुरवठा

- भाजीपाला विक्री व पुरवठा

- फळविक्री व पुरवठा

- पेट्रोल पंप, गॅस एजन्सी

- सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतूक सेवा (५० टक्के क्षमतेने)

- शासकीय व निमशासकीय कार्यालये (अत्यावश्यक सेवा वगळून) २५ टक्के उपस्थितीत

- मालवाहतूक सेवा

- बांधकामे, उद्योग, कारखाने

- किराणा दुकाने

- चिकन, मटन, अंडी, मांस दुकाने

- पशुखाद्य दुकाने

- बँक, पोस्ट सेवा

- कोरोनाविषयक लसीकरण सेवा व चाचणी केंद्र

- ऑप्टिकल्स दुकाने

- खते, बी-बियाणे दुकाने

- निवासाकरिता असलेली हॉटेल्स, लॉज (५० टक्के क्षमतेने)

Web Title: Nagpur `Lock 'for a week from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.