शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-काटोल हायवे होणार चार पदरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 20:31 IST

केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरात रस्ते विकासाचे जाळे पसरवण्याचा सपाटा लावला आहे. यात आपले नागपूरही मागे नाही. अनेक मार्ग चारपदरी होत आहेत. नागपूर - काटोल हा महामार्ग सुद्धा आता चार पदरी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

ठळक मुद्दे९६० कोटींचा प्रकल्प : संपूर्ण महामार्ग होणार सिमेंटचा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरात रस्ते विकासाचे जाळे पसरवण्याचा सपाटा लावला आहे. यात आपले नागपूरही मागे नाही. अनेक मार्ग चारपदरी होत आहेत. नागपूर - काटोल हा महामार्ग सुद्धा आता चार पदरी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.नागपूर ते काटोल हा एकूण ६० किमीचा मार्ग चार पदरी होणार आहे. केंद्र सरकारने याबाबत निर्णय घेतला असून राष्ट्रीय महामार्गाकडे हे काम सोपवण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याचा डीपीआर तयार केला आहे. हा संपूर्ण रस्ता सिमेंटचा होणार असून यावर ९५० कोटी रुपये खर्च येणार आहे.जुना काटोल नाका येथून चार पदरी रस्त्याला सुरुवात होईल. सध्या या कामाच्या निविदा काढण्यात आलेल्या आहेत. जूननंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.गोरेवाडा जंगल सुरक्षित : घरमालक व दुकानदारांमध्ये धास्तीचार पदरी रस्ता हा नियमानुसार ६० मीटरचा असतो. सध्या हा ३० ते ३५ मीटरचा आहे. त्यात वाढ होणार म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूची घरे व दुकाने हटवली जातील, हे निश्चित. परंतु शहरातील दाट वस्तीमधून चार पदरी रस्ता हा ४५ मीटरचा असतो तर मोकळ्या जागेवर तो ६० मीटरचा असतो. तसेच वने हे संरक्षित क्षेत्रात येत असल्याने त्या भागातून रस्ता जात असेल तर तो ३० मीटर इतकाच असतो. आता शहरातील जुना काटोल नाक्यापासून हा रस्ता सुरू होत आहे. दरम्यान गिट्टीखदान मकरधोकडापर्यंत रस्त्याच्या बाजूला घनदाट वस्ती आहे घरे व दुकाने मोठ्या प्रमाणावर आहेत. या भागातून रस्ता ४५ मीटरचा असला तरी अनेक घरे व दुकाने अगदी रस्त्याला लागून असल्याने ते निश्चितच या रस्त्यांमध्ये येतात. फेटरीमध्येही तशीच परिस्थिती आहे. त्यामुळे रस्त्यांवरील घरमालक व दुकानदारांमध्ये धास्ती पसरली आहे. याच रस्त्यावर गोरेवाडा संरक्षित जंगलही येते. परंतु नियमानुसार तेथून ३० मीटरचा रस्ता आताच आहे. त्यामुळे जंगलाचा भाग संरक्षित राहणार आहे.नुकसानभरपाई मिळेलयाबाबत अधिकाऱ्यांना विचारपूस केली असता त्यांनीही ही बाब मान्य केली. काही घरे व दुकाने ही अगदीच रस्त्याला लागून आहेत. त्यामुळे ती जातील. परंतु त्यांना नियमानुसार नुकसानभरपाई मिळणार आहे.कामाच्या निविदा निघाल्यानागपूर-काटोल हा रस्ता चार पदरी करण्याचा निर्णय मंत्रालयाने घेतला आहे. राष्ट्रीय महामार्गाला त्याचे काम मिळाले आहे. निविदा काढण्यात आल्या आहे. सध्या काम प्रोसेसमध्येच आहे. ४५ मीटर राईट आॅफ वे (रस्त्याच्या मध्यभागापासून अंतर) राहील. नुकसानीबाबतचा अद्याप पाहणी झालेली नाही. सध्या केवळ निविदा काढण्यात आलेल्या आहेत.अभिजित जिचकारउपमहाव्यवस्थापक (तकनिकी)राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

 

टॅग्स :highwayमहामार्गnagpurनागपूर