आॅनलाईन लोकमतनागपूर : मिलिटरीच्या ट्रकचालकाने ट्रक निष्काळजीपणे चालवून दुचाकीला जोरदार धडक दिल्यामुळे दुचाकीवर स्वार महिला जागीच ठार होऊन तिची मुलगी जखमी झाली. ही घटना कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.शुक्रवारी दुपारी ३ वाजता सोनू रवी प्रधान (२९) रा. सिलेवाडा, इंग्लिश शाळेजवळ, खापरखेडा या त्यांच्या आई आशा ईश्वर वानखेडे (४७) रा. भानेगाव खापरखेडा यांच्यासोबत मॅस्ट्रो मोपेड गाडी क्रमांक एम. एच. ४०, ए. पी-१९०४ ने जात होत्या. जुनी कामठी परिसरात नागपूर ते कामठी रोडने मागून येणाऱ्या मिल्ट्री ट्रक क्रमांक १५, डी-१९८१४४ च्या चालकाने ट्रक निष्काळजीपणे चालवून त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात आशा वानखेडे यांचा मृत्यू झाला. तर सोनू प्रधान या जखमी झाल्या. याप्रकरणी कामठी पोलिसांनी आरोपी मिलिटरीच्या ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नागपूर - कामठी मार्गावर मिलिटरी ट्रकच्या धडकेत आई ठार, मुलगी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 21:06 IST
मिलिटरीच्या ट्रकचालकाने ट्रक निष्काळजीपणे चालवून दुचाकीला जोरदार धडक दिल्यामुळे दुचाकीवर स्वार महिला जागीच ठार होऊन तिची मुलगी जखमी झाली. ही घटना कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.
नागपूर - कामठी मार्गावर मिलिटरी ट्रकच्या धडकेत आई ठार, मुलगी जखमी
ठळक मुद्देमायलेकी जात होत्या मोपेडने