शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

नागपुरात जनमंचने बुजवले जीवघेणे खड्डे : जीवनरक्षणासाठी पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 21:32 IST

नेहमीच समाजोपयोगी कार्य करणाऱ्या जनमंच संस्थेने सोमवारी शहरातील जीवघेणे खड्डे बुजविण्याची मोहीम राबविली. दिवसभरात विविध ठिकाणचे ३० वर खड्डे सिमेंट काँक्रिट टाकून बुजवण्यात आले.

ठळक मुद्दे महापालिकेपुढे ठेवला तत्परतेने काम करण्याचा आदर्श

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नेहमीच समाजोपयोगी कार्य करणाऱ्या जनमंच संस्थेने सोमवारी शहरातील जीवघेणे खड्डे बुजविण्याची मोहीम राबविली. दिवसभरात विविध ठिकाणचे ३० वर खड्डे सिमेंट काँक्रिट टाकून बुजवण्यात आले.गत ३० मार्च रोजी वाहतूक विभागाने शहरातील जीवघेण्या खड्ड्यांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर महापालिकेने तातडीने पावले उचलून खड्डे बुजवणे गरजेचे होते, परंतु तसे झाले नाही. त्यामुळे जनमंचनेच पुढाकार घेतला व जीवनरक्षणासाठी तातडीने हालचाली करणे किती आवश्यक असते, याचा आदर्श महापालिकेपुढे ठेवला. या मोहिमेला इंदोरा चौकातून सुरुवात करण्यात आली. इंदोरा चौकातील जसवंत टॉकीजपुढचा पहिला मोठा खड्डा सिमेंट काँक्रिट टाकून बुजविण्यात आला. त्यानंतर गुरूनानकपुरा, पागलखाना चौक, कल्पना टॉकीज परिसर, मोहिनी कॉम्प्लेक्स, मोक्षधाम, टेलिफोन एक्सचेंज चौक, पारडी, जुना भंडारा रोड, ग्रेट नाग रोड, गणेशपेठ बसस्थानक इत्यादी ठिकाणचे खड्डे बुजविण्यात आले. खड्ड्यांमध्ये भरलेल्या सिमेंट काँक्रिटवर पाणी टाकण्याची व आवश्यक देखभाल करण्याची जबाबदारी परिसरातील व्यक्तींवर सोपविण्यात आली. सिमेंट काँक्रिटवर पाण्याचा ओलावा राहण्यासाठी संबंधितांना पोती देण्यात आली. या मोहिमेत जनमंचचे अध्यक्ष प्रमोद पांडे, उपाध्यक्ष राजीव जगताप, महासचिव नरेश क्षीरसागर, कोषाध्यक्ष प्रल्हाद खरसने, सदस्य श्रीकांत दोड, राम आखरे, श्रीकांत देवळे, प्रकाश गौरकर, विनोद बोरकुटे, बाबा राठोड, श्रीधर उगले, टी. बी. जगताप, उत्तम सुळके, सुहास खांडेकर, आशुतोष दाभोळकर आदी सहभागी झाले होते. मोहिमेच्या यशस्वीतेसाठी वाहतूक पोलिसांनी सहकार्य केले.मनपाला निवेदन देणारजीवघेण्या खड्ड्यांची यादी जाहीर झाल्यानंतर महापालिकेने तातडीने हालचाली करून खड्डे बुजविणे गरजेचे होते. परंतु त्यांनी उदासीनता दाखविली. त्यामुळे जनमंचनेच पुढाकार घेतला. दिवसभरात शक्य झाले तेवढे खड्डे आम्ही बुजविले. आता पुढचे काम मनपाने करावे, याकरिता त्यांना निवेदन सादर करण्यात येईल. त्याकडे दुर्लक्ष केले गेल्यास जनमंच पुन्हा आंदोलन करेल. प्रमोद पांडेखड्डे बुजविणे गरजेचेजीवघेणे खड्डे संपूर्ण शहरभर आहेत. परंतु मनपा प्रशासनासह नगरसेवकांनाही त्याचे काहीच गांभीर्य नाही. खड्ड्यांमुळे रोज अपघात होत आहेत. वाहनचालक गंभीर जखमी होत आहेत. कधीही कुणाचेही प्राण हिरावले जाऊ शकतात, अशी परिस्थिती आहे. परिणामी, जनमंचची ही मोहीम महापालिकेने पुढे न्यावी.राजीव जगताप व नरेश क्षीरसागर

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर