शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

नागपूर बनतोय सोलर हब : रिलायन्स, वॉरी, पॉवरिन येणार नागपूरला; १,९०० एकरमध्ये उभारणार सौर प्रकल्प

By शुभांगी काळमेघ | Updated: June 18, 2025 19:55 IST

सूर्यनगरी नागपूर : औद्योगिक क्षेत्रात सौर उत्पादनाचा झपाटलेला वेग!

नागपूर : नागपूर जिल्हा सौर ऊर्जेच्या क्षेत्रात झपाट्याने पुढे जात असून, महाराष्ट्रात सर्वाधिक रूफटॉप सोलर इन्स्टॉलेशन्ससह अग्रेसर आहे. ‘पीएम सूर्य घर’ योजनेअंतर्गत नागपूरने ३३,६०० रूफटॉप सोलर सिस्टम्स बसवून राज्यात आघाडी घेतली आहे.

नुकतीच अवाडा इलेक्ट्रो कंपनीने बुटीबोरीत सौर पॅनेल उत्पादन सुरू केले असून, आता आणखी तीन कंपन्यांनी उत्पादन सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (MIDC) १,००० एकर जमिनीची मागणी केली आहे. वॉरी एनर्जीजने ७०० एकर तर बेंगळुरुस्थित पॉवरिन ऊर्जा या कंपनीने २०० एकर जमिनीची मागणी केली आहे.

MIDC ने यासाठी जमीन संपादन प्रक्रिया सुरू केली आहे. या कंपन्या सौर पॅनेल तसेच जनरल्स तयार करण्याचा मानस धरत असून, नागपूर हा सौर उपकरणांच्या निर्मितीचा हब म्हणून उदयास येत आहे. नागपूरने आतापर्यंत १३२.३५ मेगावॅट क्षमतेच्या ३३,६४१ सोलर सिस्टम्स बसवल्या आहेत. तुलनात्मकदृष्ट्या, जळगावने १५,८६८, पुण्याने १५,६३२ इन्स्टॉलेशन्स पूर्ण केली आहेत. मात्र त्यांची एकत्रित संख्याही नागपूरपेक्षा कमी आहे.

MSEDCLच्या नागपूर विभागातील इतर जिल्ह्यांनीही चांगली प्रगती केली आहे. अमरावतीने १२,३३१, वर्धा ६,३७६, बुलढाणा ६,२३२, अकोला ६,१३०, चंद्रपूरने ५,६१६, भंडारा ३,५९१, वाशीम २,५६२, गोंदिया २,५११ आणि गडचिरोलीने १,१४१ इन्स्टॉलेशन्स पूर्ण केली आहेत. १५ जून रोजी वर्धा जिल्ह्याने एका दिवसात ७० इन्स्टॉलेशन्स करून २४१.७ किलोवॅट सौर ऊर्जा ग्रीडला जोडली.

“अवाडा कंपनीने विक्रमी वेळेत उत्पादन सुरू केले असून इतर कंपन्यांनाही प्रेरणा मिळाली आहे. राज्य शासनाने दिलेल्या कर सवलती आणि सवलतीच्या दरातील जमीन उपलब्धतेमुळे हा उद्योग अधिक फायदेशीर ठरत आहे,” असे औद्योगिक सल्लागार जुल्फेश शहा यांनी सांगितले.

औद्योगिक विकास संघटनेचे अध्यक्ष अशिष काळे यांनी सांगितले की, या गुंतवणुकीमुळे नागपूरमध्ये अधिक रोजगार संधी निर्माण होतील आणि परकीय अवलंबित्व कमी होईल.

टॅग्स :nagpurनागपूरgovernment schemeसरकारी योजना