शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

नागपूर आयकर विभाग : अनुसूचित जाती व जमातीच्या १५० कर्मचाऱ्यांची पदावनती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 22:19 IST

आयकर विभागाच्या नागपूर कार्यालयात कार्यरत १५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पदावनत केले आहे. लॉकडाऊनमध्ये फारच कमी अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत असताना प्रधान मुख्य आयकर आयुक्तांनी पदावनतीचा आदेश काढला आहे. या आदेशामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देपंतप्रधान आणि सीबीडीटी अध्यक्षांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आयकर विभागाच्या नागपूर कार्यालयात कार्यरत १५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पदावनत केले आहे. लॉकडाऊनमध्ये फारच कमी अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत असताना प्रधान मुख्य आयकर आयुक्तांनी पदावनतीचा आदेश काढला आहे. या आदेशामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने अर्थात कॅटच्या नागपूर खंडपीठाने आरक्षणात पदोन्नती मिळविणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रकरणात आरक्षण धोरणाविरुद्ध ३० नोव्हेंबर २०२८ ला निर्णय दिला होता. संबंधित कर्मचाऱ्यांच्या विभागातर्फे या आदेशाला आव्हान दिले नव्हते. या आदेशानुसार नागपूर विभागाच्या प्रधान मुख्य आयकर आयुक्तांनी २२ एप्रिल २०२० ला आदेश जारी करून नागपुरात कार्यरत अनुसूचित जाती व जमातीच्या कर्मचाऱ्यांना पदावनत केले. या अंतर्गत इन्स्पेक्टरला टॅक्स असिस्टंट आणि टॅक्स असिस्टंटला एमटीएस पदावर खाली आणले. स्टेनोचा ग्रेडही कमी केला. यातील अनेक कर्मचारी लॉकडाऊनमुळे घरीच आहेत. सन २०१८ चा आधार मानून हा आदेश जारी केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.आदेशाला स्थगिती देण्याची पंतप्रधानांकडे मागणीडॉ. आंबेडकर एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष संजय थूल म्हणाले, केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने आरक्षण धोरणावर कर्मचाऱ्यांच्या विरोधात २०१८ मध्ये निर्णय दिला होता. अनुसूचित जाती व जमातीच्या या कर्मचाऱ्यांना विभागानेच पदोन्नती दिली आहे. त्यामुळे विभागाने ‘कॅट’च्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान द्यायला हवे होते. पण असे न करता या निर्णयाचा आधार मानून नोटिसाविना आरक्षित वर्गाच्या १५० कर्मचाऱ्यांना पदावनत करणे योग्य नाही. असोसिएशनने पंतप्रधान आणि सीबीडीटी अध्यक्षांना पत्र लिहून आदेशावर स्थगिती देण्याची मागणी केली आहे. तसेच ऑल इंडिया इन्कम टॅक्स एससी, एसटी एम्प्लॉईज वेलफेअर फेडरेशनच्या अध्यक्षा दीपशिक्षा राहाटे आणि सचिव रेखा नंदनवार यांनीही पंतप्रधान व केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाच्या अध्यक्षांना पत्र लिहून आरक्षित वर्गातील कर्मचाऱ्यांना न्याय आणि आदेशावर स्थगिती देऊन संरक्षण प्रदान करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Income Tax Officeमुख्य आयकर आयुक्त कार्यालयEmployeeकर्मचारीSC STअनुसूचित जाती जमाती