अनधिकृत बांधकामावर नागपूर सुधार प्रन्यासचा हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 00:09 IST2019-05-09T00:08:01+5:302019-05-09T00:09:14+5:30
नागपूर सुधार प्रन्यासच्या दक्षिण विभागीय क्षेत्रातील अनधिकृत इमारतीच्या बांधकामावर अतिक्रमण पथकाने बुधवारी हातोडा चालविला.

अनधिकृत बांधकामावर नागपूर सुधार प्रन्यासचा हातोडा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर सुधार प्रन्यासच्या दक्षिण विभागीय क्षेत्रातील अनधिकृत इमारतीच्या बांधकामावर अतिक्रमण पथकाने बुधवारी हातोडा चालविला.
खसरा क्रमांक ६८/१ व ६८/२ अंतर्गत मौजा बाबुळखेडा येथील भूखंड क्रमांक ७ व ७ ए येथे बहुमजली इमारतीचे अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. अनधिकृत बांधकाम पाडण्यासंदर्भात नासुप्रने नोटीस बजावली होती. त्यानंतरही बांधकाम न हटविल्याने बुधवारी पथकाने सकाळी ११ या सुमारास जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण काढण्याला सुरुवात केली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही कारवाई करण्यात आली.
अधीक्षक अभियंता (मुख्यालय) यांच्या मार्गदर्शनात नासुप्रच्या दक्षिण विभागातील कार्यकारी अभियंता संजय चिमुरकर, विभागीय अधिकारी अनिल राठोड, सहाय्यक अभियंता संदीप राऊत आणि क्षतिपथक प्रमुख मनोहर पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी कारवाईत सहभागी झाले होते.