शहरं
Join us  
Trending Stories
1
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
2
दिल्ली स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे एवढा पैसा आला कुठून? आता सगळ्यांची कुंडली काढणार
3
दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र अन् अमितही अडकणार? चौकशी होणार? 'असं' आहे या दोघांच कनेक्शन 
4
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकाणी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
5
बिहार विधानसभा निकालापूर्वी गुंतवणूकदार सावध? बाजार सपाट बंद; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
6
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
7
एसबीआयला ४,४०० रुपयांचा चुकीचा दंड लावणे महागात! आता द्यावी लागणार १.७० लाख रुपये भरपाई
8
IPL 2026: शेन वॉटसनचे आयपीएलमध्ये पुनरागमन, 'या' संघाशी जुडलं नाव!
9
टक्कल पडायची आता वाटणार नाही भीती; केसांच्या वाढीसाठी 'हे' आहे सुपरफूड, ठरेल वरदान
10
कॅशने घर घेताय? थांबा! होम लोनचा असा करा 'स्मार्ट' वापर! गृहकर्ज फिटेपर्यंत कोट्यधीश व्हाल
11
रशियाच्या शत्रू जमिनीवर गरजले भारताचे सुखोई ३० जेट; भारतीय पायलटनं उडवलं F15 विमान, चीन चिंतेत
12
Latur: अश्लील व्हिडीओ आणि तिसरीतील विद्यार्थ्याने वर्गमित्रासोबतच अनैसर्गिक...; लातुरमधील शाळेतील घटना
13
दिल्ली स्फोट : गाडीतील मृतदेह डॉक्टर उमरचाच; डीएनए जुळला! नक्की कशी पार पडली फॉरेन्सिक प्रक्रिया?
14
IPL स्टार खेळाडूवर अत्याचाराचा आरोप; तर तरुणी ब्लॅकमेल करत असल्याची क्रिकेटरची तक्रार
15
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
16
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
17
Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचं 'फिटनेस सीक्रेट'; बिझी शेड्यूलमध्ये स्वत:ला अभिनेत्री कसं ठेवते फिट?
18
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
19
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
20
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर सुधार प्रन्यासची सेंटर पॉईंट स्कूलवर मेहेरनजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 10:39 IST

दाभ्याच्या सेंटर पॉर्इंट स्कूलवर नागपूर सुधार प्रन्यास चांगलेच मेहेरबान आहे. खास शाळेसाठी नासुप्रने अवैधरीत्या रस्त्याचे निर्माण केले आहे. त्यासाठी ४०.२८ लाख रुपयांचा खर्च झाला आहे.

ठळक मुद्देरस्त्याचा निर्माण खर्चही सेंटर पॉर्इंट स्कूलकडून घेतला जाणार नाही सोसायटीकडून होईल ४०.२८ लाखाची वसुली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दाभ्याच्या सेंटर पॉर्इंट स्कूलवर नागपूर सुधार प्रन्यास चांगलेच मेहेरबान आहे. खास शाळेसाठी नासुप्रने अवैधरीत्या रस्त्याचे निर्माण केले आहे. त्यासाठी ४०.२८ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. परंतु हा खर्च शाळेकडून वसूल न करता, परिसरात जे लेआऊट पडले आहे त्या लेआऊटधारक सोसायटीकडून वसूल करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या रस्त्याचा कुठलाही रेकॉर्ड नासुप्रकडे नाही. केवळ डांबरीकरण केल्याची माहिती आहे. नासुप्र विना फाईल तयार केल्याने काम कसे करू शकते, असा सवाल उपस्थित केला जात आहे.रस्त्याच्या डांबरीकरणाचा खर्च रस्त्याला लागून असलेल्या सोसायटीकडून करण्यात येईल. शाळेकडून खर्चाची कुठलीही वसुली करण्यात येणार नाही, असे नासुप्रच्या पश्चिम विभागीय कार्यालयाकडून माहिती मिळाली आहे. या परिसराचे काम बघणाऱ्या कर्मचाऱ्याने शाळेला सूट देण्यासंदर्भात कुठलेही ठोस कारण सांगितले नाही. तसेच परिसरातील चार सोसायट्यांनी खर्चाची भरपाई दिल्याचेही सांगितले नाही. यासंदर्भात नासुप्रच्या पश्चिम विभागीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता पी.पी. धनकर यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, हा रस्ता केवळ सेंटर पॉर्इंट शाळेसाठी बांधण्यात आलेला नाही. या परिसरात १५ लेआऊट आहेत. त्यासाठी अप्रोच रोड बनविण्यात आला आहे. विशेष म्हणजे या परिसरात सेंटर पॉर्इंट शाळेव्यतिरिक्त कुठलेही बांधकाम केलेले नाही. याचा अर्थ नासुप्रचे अधिकारी खोटे बोलत आहे. ते अडचणीचे उत्तर देण्यास टाळाटाळ करीत आहे.

रस्त्याची मागणी कुणीच केली नाहीसूत्रांच्या मते, सेंटर पॉर्इंटसाठी खास बनविण्यात आलेल्या रस्त्याची मागणी कुणीच केली नाही. नासुप्रचे कार्यकारी अभियंता धनकर यांनीसुद्धा मान्य केले की, हा रस्ता त्यांच्या कार्यालयामार्फत बांधण्यात आला आहे, त्यासाठीची मागणी कुणीही केली नाही. परंतु भविष्यातील मागणी लक्षात घेता रस्त्याची निर्मिती करण्यात आली आहे.

हायटेन्शन लाईनखाली अनेक रस्ते बनले आहेतधनकर म्हणाले की, हायटेन्शन लाईनखाली शहरातील १०० हून अधिक रस्ते बनले आहेत. केवळ नागपूर शहरच नाही तर राज्यभरात हायटेन्शन लाईनखाली रस्ते आहेत. हा रस्ता बनविण्यापूर्वी महापारेषणची परवानगी घेण्यात आली होती. नियमानुसार बांधकामापूर्वी जमिनीपासून हायटेन्शन लाईनपर्यंत विशिष्ट अंतर ठेवणे गरजेचे आहे. या नियमांचे नासुप्रने पालन केले आहे.

टॅग्स :Nagpur Improvement Trustनागपूर सुधार प्रन्यास