शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

Nagpur Gram Panchayat Election Results : नागपूर जिल्ह्यात कॉंग्रेसचा गुलाल, भाजपाचीही विजयी घोडदौड !

By जितेंद्र ढवळे | Updated: November 6, 2023 13:06 IST

देशमुखांच्या काटोलमध्ये अजित पवार गटाने खाते उघडले, सावनेर मतदार संघात कॉंग्रेसच्या केदार यांची जादू कायम भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या कामठीत कॉंग्रेस-भाजपा फिफ्टी-फिफ्टी

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील ३५७ ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या निकालात कॉंग्रेस समर्थित गटाच्या सरपंच पदाच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे. माजी गृहमंत्री आ.अनिल देशमुख यांच्या काटोल मतदार संघात अजित पवार गटाचे खाते उघडले आहे. मात्र तालुक्यातील बहुतांश ग्रा.पं.वर राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे सरपंच विजयी झाले आहे. भिवापूर तालुक्यातील चिखल ग्रा.पं.त शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या प्रणाली सतीष गारघाटे यांनी दमदार विजय मिळविला आहे. 

जिल्ह्यातील ३५७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ५ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी रविवारी बंपर मतदान झाले होते.नरखेड तालुका - नरखेड तालुक्यातील २९ ग्रा.पं.साठी रविवारी मतदान झाले. यात मोगरा ग्रा.पं.च्या सरपंचपदी भापपा समर्थित गटाच्या मीनाक्षी उमेश्वर मडके विजयी झाल्या आहे. याशिवाय गोधणी गायमुख ग्रा.पं.च्या सरपंच पदी भाजप समर्थित गटाच्या मीना सुरेशसिंग सूर्यवंशी विजयी झाल्या आहे. आ.अनिल देशमुख यांचा बालेकिल्ला असलेल्या नरखेड तालुक्यातील खरसोली ग्रा.पं.मध्ये अजित पवार गटाच्या नीलिमा नरेश अरसडे विजयी झाल्या आहेत. नरेश अरसडे हे अजित पवार गटाचे काटोल-नरखेड विधानसभा मतदार संघाचे प्रमुख आहे. 

मोहदी (धोत्रा) ग्रा.पं.च्या सरपंचपदी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) राजू नाखले विजयी झाले आहेत. नारसिंगी ग्रा.पं.त भाजपच्या नलु प्रवीण काकडे विजयी झाल्या आहेत. मोहगाव (भदाडे) ग्रा.पं.च्या सरपंचपदी निर्मला जयपाल चणकापुरे व राष्ट्रवादी समर्थित ७ सदस्य विजयी झाले आहेत तर भारसिंगी ग्रा.पं.च्या सरपंचपदी स्थानिक आघाडीच्या शारदा रवींद्र धवराळ विजयी झाल्या आहेत. कामठी तालुका - भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांचा बालेकिल्ला असलेल्या कामठी तालुक्यात १० ग्रा.पं.साठी निवडणुका झाल्या. यात भाजप आणि कॉंग्रेस समिर्थित गटाचे सरपंचपदाचे ५ उमेदवार विजयी झाले आहेत. तालुक्यात भाजपाचा विजयरथ रोखण्यात कॉंग्रेस नेते सुरेश भोयर यांना काही अंशी यश आले आहे. तालुक्यातील बाबुळखेडा ग्रा.पं.च्या सरपंचपदी भाजप समर्थित गटाचे कदीर इमाम छवारे तर वारेगाव ग्रा.पं. सरपंचपदी काँग्रेस समर्थित गटाच्या रत्‍ना अजाबराव उईके विजयी झाल्या आहेत. कवठा ग्रा.पं.च्या सरपंचपदी भाजप समर्थित गटाचे निलेश श्रीधर डफरे तर नेरी ग्रा.पं.च्या सरपंचपदी भाजप समर्थित गटाच्या सुजाता सुरेश पाटील विजयी झाल्या आहेत. कळमेश्वर तालुका - कॉंग्रेसचे आ. सुनील केदार यांच्या सावनेर मतदार संघातील कळमेश्वर तालुक्यात कॉंग्रेस समर्थित गटाच्या सरपंचपदाच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे. येथे २१ ग्रा.पं.साठी निवडणुका झाल्या आहेत. यात बोरगाव (खुर्द) ग्रा.पं.च्या सरपंचपदी महादेव वानखेडे यांनी दमदार विजयी मिळविला आहे. ते ४५९ मतांनी विजयी झाले. याशिवाय तालुक्यातील झुनकी, भडांगी, आष्टीकला ग्रा.पं.मध्ये कॉंग्रेस समर्थित गटाने बाजी मारली आहे. तालुक्यात दहेगाव आणि सावळी (खुर्द) ग्रा.पं.मध्ये भाजपा समर्थित गटाचे सरपंच विजयी झाले आहेत.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकnagpurनागपूर