Nagpur Graduate Constituency; नागपुरात उद्या मतदान, प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 10:29 AM2020-11-30T10:29:54+5:302020-11-30T10:30:17+5:30

Nagpur Graduate Constituency विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी १ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. यासाठी निवडणूक प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे.

Nagpur Graduate Constituency; Polling tomorrow in Nagpur, administration ready | Nagpur Graduate Constituency; नागपुरात उद्या मतदान, प्रशासन सज्ज

Nagpur Graduate Constituency; नागपुरात उद्या मतदान, प्रशासन सज्ज

Next
ठळक मुद्देप्रत्येक मतदान केंद्रावर कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी १ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. यासाठी निवडणूक प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. कोविड संसर्ग काळातील ही निवडणूक असल्यामुळे मतदारांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली आहे.

नागपूर विभागात एकूण २ लाख ६ हजार ४५४ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यासाठी ३२२ मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत. कोरोना संदर्भात सूचनांचे पालन करूनच हे मतदार केंद्र निश्चित करण्यात आले आहे. प्रत्येक मतदान केंद्रात मतदारांमध्ये सुरक्षित अंतर राहील, यासाठी ठराविक अंतरावर वर्तुळ आखून देण्यात आले आहेत. आवश्यक सूचना फलक लावण्यात आले आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर बैठकीची व्यवस्था केली आहे. सॅनिटायझेशनची व्यवस्थाही केली आहे.

काेविड ग्रस्तांना शेवटच्या तासात करता येईल मतदान

कोविड संसर्ग झालेल्या मतदाराला सुद्धा शेवटच्या तासात म्हणजे ४ ते ५ या वेळात मतदान करता येईल. यासाठी सुरक्षेची सगळी खबरदारी घेऊन कोविडग्रस्तांना मतदान करता येईल.

दिव्यांग मतदारांसाठी विशेष हेल्पलाईन

पदवीधर दिव्यांग मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी घरपोच पाोस्टल मतदानाची व्यवस्थाा प्रशासनाने केली होती. यासाठी ज्यांनी अर्ज केला, त्यांचे मतदान झाले आहे. परंतु प्रत्यक्ष मतदान केंद्रात जााऊन मतदान करणाऱ्या मतदारांना कुठलीही अडचण जाऊन नये, याचीही खबरदरी प्रशासनाने घेतली आहे. दिव्यांग मतदारांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातच हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. ०७१२-२७००९०० व ७२६२८०१२०१ या दोन क्रमांकावर काही अडचण आल्यास ते संपर्क करू शकतील. तसेच मतदान केंद्रांवर रॅम्प व व्हीलचेअरची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा

१ डिसेंबर रोजी मतदान होणार असून प्रत्येकाला मतदानाचा हक्क बजावता याावा, यासाठी सर्व शासकीय कार्यालयाचे विभागप्रमुख तसेच खासगी औद्योगिक आस्थापनामधील अधिकारी व कर्मचारी मतदार यांना एक दिवसाची विशेष नैमित्तीक रजा मंजूर करण्यात आली असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी रवींद्र खजांजी यांनी सांगितले.

मनपा झोन कार्यालयात सोमवारीही कर्मचारी तैनात राहणार

मंगळवारी मतदानाच्या दिवशी मतदारांचे नाव शोधण्यासाठी जाणारा वेळ लक्षात घेता मतदानाच्या उद्या एक दिवस आधी देखील शहरात महानगरपालिकेच्यावतीने दहा झोननिहाय मतदान केंद्रावर संगणक व टॅबसहीत कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय मतदानाच्या दिवशी हे केंद्र सुरु राहील.

पदवीधरांनो मतदान करा

लोकशाही बळकट व समृद्ध करण्यासाठी १ डिसेंबर रोजी होणाऱ्या पदवीधर निवडणुकीत नोंदणी केलेल्या पदवीधर मतदारांनी मतदान करावे.

डॉ. संजीव कुमार, निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त

१०० टक्के मतदान करा

मंगळवाारी मतदान हेणार आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान चालेल. तेव्हा नोंदणी केलेल्या पदवीधर मतदारांनी १०० टक्के मतदान करावे.

रवींद्र ठाकरे, जिल्हाधिकारी

Web Title: Nagpur Graduate Constituency; Polling tomorrow in Nagpur, administration ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.