लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हे शाखा पोलिसांनी गोकुळपेठ परिसरात सुरू असलेल्या दोन हुक्का पालर्रवर धाड टकून सहा आरोपींनी अटक केली. कारवाईदरम्यान हुक्का पार्लरच्या मालकाकह मॅनेजर फरार झाला. सिगारेट आणि तंबाखूजन्य उत्पादन अधिनियम २००३ मध्ये बदल केल्यानंतर गुन्हे शाखा पोलिसांची ही दुसरी कारवाई आहे.अंबाझरी पोलीस ठाणे हद्दीतील गोकुळपेठस्थित लक्ष्मीकृपा अपार्टमेंट येथे दोन हुक्का पार्लर सुरू होते. पोलीस चमूला माहिती मिळताच त्यांनी बुधवारी दुपारी अपार्टमेंटच्या पहिल्या माळ्यावरील स्पेड्स रेस्ट्रो अॅण्ड लाँच आणि दुसऱ्या माळ्यावरील ९ लाँच रेस्ट्रोवर धाड टाकली. पोलिसांना दोन्ही ठिकाणी हुक्का पिताना लोक आढळून आले. पोलिसांनी पहिल्या माळ्यावरील रेस्ट्रोचे रूपेश वानखेडे, (२४), अक्षय माळे (२४), सौरभ उईके (२०), पाशा उईके (२६), नंदू मंगºया इनवाती (१८) यांना अटक केली. त्यांचा मालक सनी ऊर्फ अभिषेक जैन रा. इतवारी हा फरार झाला. तसेच दुसºया माळ्यावरील रेस्ट्रोमधून कर्मचारी प्रतीक खडसे याला अटक केली. त्याचा मालक अभिनव अशोक सोनटक्के (३५) रा. एकतानगर, बोरगाव आणि मॅनेजर विक्की फरार झाले.पोलीस कारवाईदरम्यान ७८ हजराचे सामान जप्त करण्यात आले. एकाच वेळी दोन हुक्का पार्लरवर कारवाई केल्याने अंबाझरी पोलीस ठाण्यात खळबळ उडाली आहे. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई निरीक्षक अंचल मुदगल, एपीआय जितेंद्र बोबडे, पीएसआय दत्ता पेंडकर, राजकुमार त्रिपाठी, कर्मचारी मोहन साहू, रवींद्र गावंडे, अरविंद झिलपे, सतीश पांडे, योगेश गुप्ता, आशिष पाटील, प्रशांत देशमुख, योगेश शेलोकर, संतोष निखार, बलजित ठाकूर, श्याम गोरले आणि निनाजी तायडे यांनी केली.
नागपुरात गोकुळपेठेतील हुक्का पार्लरवर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 01:00 IST
गुन्हे शाखा पोलिसांनी गोकुळपेठ परिसरात सुरू असलेल्या दोन हुक्का पालर्रवर धाड टकून सहा आरोपींनी अटक केली. कारवाईदरम्यान हुक्का पार्लरच्या मालकाकह मॅनेजर फरार झाला. सिगारेट आणि तंबाखूजन्य उत्पादन अधिनियम २००३ मध्ये बदल केल्यानंतर गुन्हे शाखा पोलिसांची ही दुसरी कारवाई आहे.
नागपुरात गोकुळपेठेतील हुक्का पार्लरवर धाड
ठळक मुद्देदोन ठिकाणी कारवाई, सहा कर्मचाऱ्यास अटक : मालकासह तिघे फरार