शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात बसथांब्यावर तरुणीचा विनयभंग, मित्रालाही मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 19:59 IST

बसथांब्यावर मित्रासोबत उभ्या असलेल्या एका तरुणीला चाकूचा धाक दाखवून आॅटोचालकाने तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले. त्याला विरोध केला म्हणून तरुणीच्या मित्राला चाकू दाखवून बेदम मारहाण केली.

ठळक मुद्दे छत्रपती चौकात आॅटोचालकाची गुंडगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बसथांब्यावर मित्रासोबत उभ्या असलेल्या एका तरुणीला चाकूचा धाक दाखवून आॅटोचालकाने तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले. त्याला विरोध केला म्हणून तरुणीच्या मित्राला चाकू दाखवून बेदम मारहाण केली. गुरुवारी रात्री ७.३० ते ७.४५ च्या सुमारास छत्रपती चौकाजवळ ही संतापजनक घटना घडली.श्रीकांत देवाजी भुजाडे (वय ३३) असे या गुंड आॅटोचालकाचे नाव आहे. तो अजनी चौकात राहतो. तक्रारदार तरुणी नर्सिंगच्या अभ्यासक्रमाला आहे. गुरुवारी रात्री तिचा मोबाईल गहाळ झाला. त्यामुळे तिच्या मित्रासोबत गुरुवारी रात्री छत्रपती चौकाजवळच्या बसथांब्यावर ती उभी होती. तिला धंतोली पोलीस ठाण्यात मोबाईल हरविल्याची तक्रार द्यायला जायचे होते. त्यामुळे ती बर्डीकडे जाणाऱ्या  वाहनाची वाट बघत उभी होती. तेवढ्यात आरोपी आॅटो (एमएच ४९/ ई २३७६)चा चालक भुजाडे त्याच्या एका साथीदारासह तेथे आला. त्याने तरुणीला अश्लील हातवारे करून आॅटोत बसण्यास सांगितले. तिने नकार दिला असता आरोपीने तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तरुणीच्या मित्राने आरोपी भुजाडेला विरोध केला. त्यावरून आरोपी भुजाडे आणि त्याच्या साथीदाराने तरुणीच्या मित्राला मारहाण केली. तरुणीला चाकू दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. या संतापजनक प्रकरणामुळे बसथांब्यावर तणाव निर्माण झाला. त्यानंतर आरोपी आॅटोचालक भुजाडे आणि त्याचा साथीदार पळून गेला. या प्रकरणाची तक्रार पीडित तरुणीने धंतोली ठाण्यात नोंदवली.नेहमीचीच गुंडगिरीपोलिसांनी आरोपी भुजाडे आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. त्याची कुणकुण लागताच आरोपी फरार झाले. त्यांचा धंतोली पोलीस शोध घेत आहेत. विशेष म्हणजे, या प्रकरणामुळे आरोपी आॅटोचालकांची गुंडगिरी पुन्हा एकदा चर्चेला आली आहे. रात्रीच्या वेळी महिला-मुलींना बघून अनेक आॅटोचालक त्यांच्याशी लज्जास्पद वर्तन करतात. सोबतच्या व्यक्तीने विरोध केल्यास त्याला मारहाण करणे, अपमानीत करण्याचे प्रकार घडतात. सीताबर्डीत काही दिवसांपूर्वी आॅटोचालकांनी एका तरुणीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता.

टॅग्स :Molestationविनयभंगnagpurनागपूर