नागपुरात विद्यार्थीनीला दिली अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी, पाठलाग करून दिली चिठ्ठी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2017 03:37 PM2017-11-07T15:37:45+5:302017-11-07T15:38:37+5:30

महाविद्यालयीन विद्यार्थीनीचा (वय १७) पाठलाग करून  तिला अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी देणाऱ्या एका एमबीएच्या विद्यार्थ्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

In Nagpur, the girl threatened acid attack and chased chitli | नागपुरात विद्यार्थीनीला दिली अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी, पाठलाग करून दिली चिठ्ठी

नागपुरात विद्यार्थीनीला दिली अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी, पाठलाग करून दिली चिठ्ठी

Next

नागपूर- महाविद्यालयीन विद्यार्थीनीचा (वय १७) पाठलाग करून  तिला अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी देणाऱ्या एका एमबीएच्या विद्यार्थ्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हाशिम मलीक (वय २२) असे त्याचे नाव असून तो शांतीनगर परिसरात राहतो. 

पीडित युवती १२ वीची विद्यार्थीनी आहे. आरोपी हाशिम हा सधन परिवारातील आहे. त्याचे वडील कंत्राटदार असून त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे. तो एमबीए करीत आहे. तक्रारदार युवतीवर त्याचे एकतर्फी प्रेम आहे. त्यामुळे तो तिचा नेहमी पाठलाग करतो. सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे तो तिचा पाठलाग करू लागला आणि संधी मिळताच त्याने तिच्या महाविद्यालयाजवळ तिला चिठ्ठी देण्याचा प्रयत्न केला. पीडित युवतीने त्याला दाद दिली नाही. त्याने प्रपोज करताच तिने स्पष्ट नकार दिला. त्यामुळे तो संतप्त झाला. त्याने तिला ही बाब कुणाला सांगितल्यास चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकेन, अशी धमकी दिली. घाबरलेल्या युवतीने आपल्या पालकांना ही माहिती देऊन सायंकाळी सदर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. 

दरम्यान, हाशिमविरुद्ध धमकी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. मंगळवारी दुपारी १ वाजता त्याला ताब्यात घेण्यात आलं असून पुढील चौकशी सुरू आहे.
 

Web Title: In Nagpur, the girl threatened acid attack and chased chitli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.