शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

नागपूरकन्येची हॉलिवूडमध्ये ‘एन्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 11:42 IST

अवघ्या पंचेविशीत असलेल्या या तरुणीने स्वत:च्या कौशल्यातून अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमध्ये केवळ पायच रोवला नाही तर दोन चित्रपटांच्या निर्मितीचे कामही सुरू केले आहे.

ठळक मुद्देलॉस एंजलिसमध्ये पाय रोवतेय नयनाफिल्म निर्मितीच्या क्षेत्रात पदार्पण

निशांत वानखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हॉलिवूड म्हणजे जगभरातील चित्रपट कलावंतांची पंढरी. म्हणूनच या क्षेत्रात काम करणारे कलावंत, तंत्रज्ञ हॉलिवूडमध्ये काम करण्याचे स्वप्न उराशी बाळगून असतात. अगदी मायानगरी मुंबईच्या मोठमोठ्या कलावंतांना ही सुप्त इच्छा असते. हे स्वप्न पूर्णत्वाकडे नेण्यासाठी एका नागपूरकन्येने वाटचाल सुरू केली आहे. अवघ्या पंचेविशीत असलेल्या या तरुणीने स्वत:च्या कौशल्यातून अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमध्ये केवळ पायच रोवला नाही तर दोन चित्रपटांच्या निर्मितीचे कामही सुरू केले आहे.नयना गाडे असे या तरुणीचे नाव आहे. टीव्हीवरील मालिकांमधली जादूई दुनिया पाहताना आपणही या क्षेत्रात काम करावं, हे स्वप्न लहानपणापासून उराशी बाळगलेली नयना. या स्वप्नाने मोठेपणीही तिचा पिच्छा सोडला नाही. अमरावती बोर्डातून १२ वीची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर आधीच घेतलेल्या माहितीनुसार तिने मुंबई गाठली आणि बॅचलर इन मास मीडिया या तीन वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. नाट्य व फिल्म मेकिंगचे तंत्र ती या अभ्यासक्रमात शिकली. कोर्सच्या अंतिम वर्षात विद्यार्थ्यांचा नाटक व लघुपट निर्मितीचा अनुभव यावा म्हणून चित्रपट व नाट्य क्षेत्रातील मान्यवर कलावंत व तज्ज्ञांशी संवाद व्हायचा. या संवादातूनच कोर्स पूर्ण झाल्यानंतर नयनाला बीबीसीच्या एका शोमध्ये सहायक निर्माती म्हणून संधी मिळाली व पुढे विविध टीव्ही वाहिन्यांवर काही मालिका व रिअ‍ॅलिटी शोमध्ये असोसिएट प्रोड्यूसर म्हणूनही संधी मिळत गेल्या.या कामादरम्यान आणखी शिकण्याची धडपड सुरूच होती. टीव्ही इंडस्ट्रीत काम करताना चित्रपट निर्मितीच्या तांत्रिक बाजू तिला खुणावू लागल्या. या क्षेत्रातील तंत्राचे अत्याधुनिक व सखोल ज्ञान घेण्यासाठी तिचे प्रयत्न सुरू असताना न्यूयॉर्क फिल्म अकॅडमी या जगप्रसिद्ध फिल्म प्रोड्यूसिंग इन्स्टिट्यूटमध्ये दोन वर्षाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची माहिती मिळाली. कामाचा अनुभव व इंग्रजी भाषेच्या कौशल्यामुळे नयनाला या इन्स्टिट्यूटमध्ये संधीही चालून आली आणि मग सुरू झाला स्वप्नांचा प्रवास.कोणतीही नवीन गोष्ट शिकण्याची तळमळ, त्यासाठी प्रामाणिकपणे कष्ट करण्याची तयारी आणि जिद्द नयनाने हळूवारपणे थेट हॉलिवूडमध्ये भक्कमपणे पाय रोवायला सुरुवात केली आहे. योग्य पटकथेची निवड, त्यातील संवाद लेखन, निर्देशन, संपादनामध्ये समन्वय साधणे, प्रोजेक्टच्या यशस्वी पूर्ततेसाठी निधी उपलब्ध करणे, योग्य कलावंत व तंत्रज्ञांची जमवाजमव, चित्रीकरणासाठी योग्य स्थळाची निवड, सेटस्ची उभारणी, ध्वनिसंयोजन व संगीत संयोजनात लक्ष ठवणे, अ‍ॅनिमेशन, कलर मिक्सिंग, रेकॉर्डिंग अशा बऱ्याच जबाबदाºया प्रोड्यूसरला प्रोडक्शन टीमच्या मदतीने सांभाळाव्या लागतात. स्वत:च्या तांत्रिक क्षमतेने, अभ्यासू व चिकाटी वृत्तीने हे आव्हान नयनाने आपल्या खांद्यावर घेतले असून, स्वप्नांच्या दुनियेतील स्वप्नपूर्तीकडे तिचा प्रवास वेग धरायला लागला आहे.प्रोड्युसर, रायटर व क्रिएटिव्ह डायरेक्टरची जबाबदारीशैक्षणिक सत्रातील आव्हानात्मक प्रोजेक्टस्मुळे अनुभव व क ल्पकवृत्तीचे जाणकार, प्रस्थापित चित्रपट निर्माते, अभिनय क्षेत्रातील मान्यवर व तंत्रज्ञांशी व्यावसायिक संबंध तयार झाले. याच संबंधातून व तिच्या कलात्मक कौशल्यातून २०१८ ला अभ्यासक्रमाच्या समाप्तीनंतर ‘शुगर’ या चित्रपटाची कार्यकारी निर्माती म्हणून काम करण्याची संधी मिळाली व तिनेही या संधीचे सोने केले. यानंतर टीव्ही वाहिनीवर एक मालिका व आता ‘स्नॅप्ड’ या दुसºया चित्रपटाच्या प्रोड्यूसर रायटर व क्रिएटिव्ह डायरेक्टरची जबाबदारी तिला मिळाली आहे.

टॅग्स :Hollywoodहॉलिवूड