शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

नागपुरात केवळ एका सिग्नलवर तब्बल दीड लाख रुपयाचे इंधन जाते वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 11:35 IST

नागपुरात केवळ एका चौकात रेड सिग्नलवर थांबणाऱ्या वाहनांमुळे प्रति तास १लाख ४९ हजार ४७५ रुपयाचे इंधन वाया जाते.

ठळक मुद्देव्हीएनआयटीच्या अभ्यासात झाला उलगडारविनगर चौकातील निरीक्षण

सैयद मोबीनलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चौकाचौकांमध्ये सिग्नलवर थांबणाऱ्या वाहनांमुळे वेळेचे आणि इंधनाचेही नुकसान होते. शिवाय, पर्यावरणावरही त्याचा विपरीत परिणाम होतो. या संदर्भात विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान (व्हीएनआयटी)च्या विद्यार्थ्यांनी केलेल्या अभ्यासात आश्चर्यचकित करणारे आकडे पुढे आले आहेत. केवळ एका चौकात रेड सिग्नलवर थांबणाऱ्या वाहनांमुळे प्रति तास १लाख ४९ हजार ४७५ रुपयाचे इंधन वाया जाते. या अनुषंगाने विचार केल्यास दरवर्षी हे नुकसान १३० कोटी ९४ लाख २ हजार ५६८ रुपये इतके होते.व्हीएनआयटीच्या ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंगचे विभाग प्रमुख प्रो. डॉ. विश्रुत लांडगे यांच्या मार्गदर्शनात अभिषेक कुमार सिंह, सौरभ पंजाबी, प्राजक्ता देव व शौनक झुलकंठीवार या विद्यार्थ्यांनी रविनगर चौकातील निरीक्षणानुसार आपले आकडे सादर केले. जुलै २०१९ ते मार्च २०२० या काळात केलेल्या या अभ्यासात सकाळी व संध्याकाळी अत्यंत घाईगडबडीच्या वेळेची निवड करण्यात आली होती. नागपूर शहरात ही वेळ सकाळी ८ ते दुपारी १२ व संध्याकाळी दुपारी ४.३० ते ७.३० वाजताची आहे. त्याअनुषंगाने सिग्नलवर वाहने थांबल्यामुळे खर्च होणारा वेळ, इंधनासह पर्यावरणाला होणारे नुकसान मोजण्यात आले. अभ्यासात सर्वात जास्त नुकसान वेळेचे दिसून आले. त्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर इंधन आणि तिसऱ्या क्रमांकावर पर्यावरणाचे नुकसान आले. ही आकडेवारी शहरातील एका चौकाची आहे. जर सर्व लहान मोठ्या चौकांचे निरीक्षण केल्यास ही आकडेवारी विस्मयकारी ठरण्याची शक्यता आहे.वाहनांची वाढती संख्या हे प्रमुख कारण: चौकांमध्ये सिग्नलवर थांबल्यावर वेळ, इंधन आणि पर्यावरणाचे होणाऱ्या नुकसानीचे प्रमुख कारण वाहनांची वाढती संख्या आहे. उड्डाण पुलांची संख्या वाढवण्यात आली तर होणारे हे नुकसान बऱ्यापैकी कमी होऊ शकते. हे अशाप्रकारचे निरीक्षण संशोधन अन्य सिग्नलवरही केले जाईल. खरे तर हा अभ्यास जून २०२० पर्यंत करण्यात येणार होता. मात्र, टाळेबंदीमुळे मार्चमध्येच पूर्ण करण्यात आल्याची माहिती डॉ. विश्रुत लांडगे यांनी दिली.

 

टॅग्स :Petrolपेट्रोल